शिरपूर शहर पोलीस ठाण्यात जप्त मोटर सायकलची ओळख पटवण्याचे आवाहन , अन्यथा पोलिसांकडून लिलाव
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना शिरपूर शहर पोलीस स्टेशन कडून आवाहन करण्यात आले आहे की शहर पोलीस स्टेशनच्या आवारात विविध कंपन्यांच्या 113 मोटरसायकली काही वर्षांपासून बेवारस पडून आहेत. ज्यांच्या या मोटरसायकल आहेत त्या मालकांनी अद्याप पोलीस स्टेशनची याबाबत कोणताही संपर्क केलेला नाही. त्यामुळे ज्यांची कोणाची वाहने काही कारणास्तव शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असतील अशा नागरिकांनी आपल्या वाहनाची कागदपत्रासह ओळख पटवून ती घेऊन जावीत. दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत शहर पोलीस ठाण्याची संपर्क साधून आपले वाहन घेऊन जावे असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या मुदतीनंतर मात्र शहर पोलिसांकडून या वाहनांच्या जाहीर लिलाव करण्यात येईल आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकांवर कळवण्यात आले आहे.
.jpeg)