अबब सरपंच यांनी मागितली ५लाख रु. लाच, १लाख स्वीकारली पण...




अबब सरपंच यांनी मागितली ५लाख रु. लाच, १लाख स्वीकारली पण...

धुळे प्रतिनिधी -

धुळे जिल्ह्यात सरपंच यांनी ५लाख रु. लाच मागितली, २.५० लाख देणे ठरले, सुरुवातीची रक्कम १लाख  स्वीकारताना धुळे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक करून सरपंच व माजी सरपंच यांना अटक करण्यात आली आहे.

रविंद् निंबा पाटील, सरपंच व अतुल विठठल शिरसाठ, माजी सरपंच, ग्रामपंचायत, नंदाणे, ता. जि. धळे व यांनी तक्रारदार यांचेकडे ५,00,%00/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाणे ता. जि. धुळे येथील गट नं. ५९/३ येथे शेतजमीन असुन सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळणेकरीता विभागिय व्यवस्थापक, नायरा एन्जी लिमिटेड यांनी दि.०१.०९.२०२४ रोजी धुळे जिल्हाधिकारीnकार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच/ ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाणे, ता. जि. धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोलपंप उभारणी करीता नाहरकत
प्रमाणपत्र मिळणे करीता दिलेले पत्र तकारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचेकडे जमा
केले होते. त्यानंतर तकारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय, नंदाणे
येथे जावुन सरपंच रवींद्र निंबा पाटील ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा
केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन नाहरकत प्रमाणपत्र
देण्यासाठी स्वतःकरीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचेकरीता ५,%०,0 00/- रूपये लाचेची
मागणी केल्याची आज दि.२४.०१.२०२५ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तकार दिली
होती.तकारदार यांनी दिलेल्या तकारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सरपंच रविंद्र निंबा पाटील यांनीव त्यांचेसोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तकारदार यांच्याकडे तडजोडीअंती २,५०,000/ - रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १,००,०००/ - रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा
कारवाई दरम्यान सरपंच रवींद्र पाटील यांनी तकारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन १,००,000/- रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांचेकडे दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांचे खिशात ठेवुन घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची काराई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस
अधीक्षक मा. शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने