पत्रकार रणवीर सिंह राजपूत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नववर्षनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार/ निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री. रणवीरसिंह राजपूत यांना नववर्षाच्या शुभारंभी ठाणे येथे
जीवन गौरव पुरस्कार* बहाल करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी ठाण्याचे खासदार श्री.नरेश म्हस्के मा.आमदार श्री.रविंद्र फाटक, माजी महापौर सौ.मीनाक्षीताई शिंदे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर आदी मान्यवर उपस्थित होते.नव वर्ष सुरू होताच फटाक्यांची आतिषबाजी अन् जयघोष सुरू झाला. मा.मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर नववर्षाच्या शुभारंभी त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापूर्वी देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे पत्रकार म्हणून समाजाला फार मोठे योगदान लाभले आहे. आणि माहिती अधिकारी म्हणून देखील त्यांनी प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पडली आहे.
आपल्या सेवानिवृत्तीनंतर ते सध्या मुक्त पत्रकारिता करत असून विविध प्रसार माध्यमांसाठी लेखन करण्याचे काम ते करत असतात. सर्वच विषयांवर त्यांचे विशेष असा अभ्यास असून विविध विषयांवर नियमित लेखन करत असतात.
त्यांच्या या सर्व जीवनपटातील परिश्रमाचे फळ म्हणून त्यांच्या कार्याच्या गौरव करण्यात आला आणि त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
