शिरपूर शहरात पत्रकार दिवस उत्साहात साजरा
शहरातील कॅफेंवर बंदीचा एकमताने निर्णय
करवंद शहरात उभारणार प्रशस्त पत्रकार भवन
शिरपूर प्रतिनिधी - पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने सहा जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिवस साजरा केला जातो. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिरपूर शहरात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधवांकडून पत्रकार दिवसाच्या आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, पंचायत समिती सभापती वसंत पावरा, आत्मनिर्भर भारत की जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, माजी नगराध्यक्ष हेमंत पाटील, सोबत ज्येष्ठ पत्रकार रत्नदीप सिसोदिया, राजेंद्र पाटील, रामदास पुरी, अरुण दलाल, किशोर माळी ,सचिन पाटील,शिरपूर तालुक्यातील व शहरातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी संपादक आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संपादक रत्नदीप सिंह सिसोदिया यांनी दरवर्षी पत्रकारांच्या कार्यक्रम हा पत्रकारांनाच आयोजित करावा लागतो, यासाठी कोणीही शासकीय प्रतिनिधी अथवा राजकीय प्रतिनिधी पुढाकार घेत नाहीत याबाबत खंत व्यक्त केली. शिवाय शहरात कॅफे संस्कृतीने शहरातील तरुण-तरुणींचे वातावरण दूषित होत असून सामाजिक स्वास्थ खराब होत आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या सर्व वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असून या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी एकमताने शहरातील कॅफेबंदीचा ठराव मंजूर केला. यानंतर सर्व राजकीय प्रतिनिधींनी त्यास समर्थन दिले.
सोबत तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्यात एक पत्रकार भवन असावे अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. त्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्वयंपूर्ण करवंद शिवारात पत्रकार भवनासाठी तीन हजार स्क्वेअर फुटांची जागा देण्याचे आश्वासन दिले. आणि सदरची जागेच्या ठराव झाल्यानंतर या जागेवर प्रशस्त असे पत्रकार भवन उभारण्यासाठी मदतीचे आश्वासन आमदार पावरा यांच्याकडून देण्यात आले.
याप्रसंगी राहुल रंधे हेमंत पाटील, राजेंद्र पाटील , आणि आमदार काशीराम पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात पत्रकारांची असलेली नाराजी लक्षात घेता पुढील वर्षी हा कार्यक्रम आमदार काशीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे राहुल गांधी आणि हेमंत पाटील यांनी आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र माळी यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
