मयत दिपाली चा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यासह कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आश्वासन
शहादा तालुक्यातील मलोणी येथील चाकू हल्ल्यात मयत विवाहिता दिपाली चित्ते हिच्या घरी आमदार राजेश पाडवी यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासह कुटुंबीयांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले किरकोळ वादातून दिपाली चित्ते हिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता सुरत येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाळला जात आहे आज सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांनी मलोणी येथे जाऊन पती सागर चित्ते व कुटुंबीयांची भेट घेतली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून सदरचा घटना जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी आपण गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे त्याचप्रमाणे या दांपत्याला एक वर्षाचा मुलगा असून त्याला शासकीय पातळीवर मदत मिळवून दिली जाईल त्याचप्रमाणे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील पोलीस निरीक्षक निलेश देसले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा,विनोद जैन, मुनेश जगदेव,दिनेश खंडेलवाल,नारायण ठाकरे,काशीनाथ सोनार,भरोसा मोरे,गोविंद पटले,घनश्याम पाठक,गोपाल गागुर्डे,गोपाल पावरा,प्रदीप ठाकरे,प्रशात महिरे,आझाद ठाकरे,भरत महाराज,विशाल पावरा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
