वृक्ष मित्र शिवाजी राजपूत यांना राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार.
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना भाऊसाहेब माने कृषी महाविद्यालय उमरखेड यवतमाळ येथील राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव माने,विभागीय कृषी संचालक प्रमोद लवाळे,मा.कुलगुरु निंबाळकर,मा.आमदार विजयराव खडसे,डॉ.विजयराव माने, जि.अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अध्यक्ष अशोक वानखेडे,संचालक ॲड.अर्चना माने,उद्योगपती नितीन माहेश्वरी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले गेल्या 32 वर्षापासून स्वतःच्या शेतात सागवान, निलगिरी, बोर, लिंबू, सिताफळ, आवळा इत्यादी झाडांचे लागवड करून लाखोचे उत्पादन घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित उपाधी देऊन गौरविण्यात आले त्या पिकानंतर टप्प्याटप्प्याने 50 एकर क्षेत्रावर 19 प्रकारच्या बांबूंची लागवड करून पर्यावरण संतुलनाचे महत्त्वाची भूमिका निभावून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन,परिसरात गारवा निर्माण करून मानवनिर्मित जंगल उभे केले आहे आज हे वृक्ष उंचीला 40 फुटापर्यंत आहे.परिसरात जैविक विविधतेची परिसंस्था निर्माण झाली आहे.बांबूच्या वनात विविध पक्षी,मोर, हरीण, ससा,नीलगाय, तरस, रानडुकरे, सर्प, घोरपड,साईसर(साळीदंर), लांडगा व बिबट्या हे प्राणी या जंगलात आडळून आलेत. सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेस शेतात पक्षांचा आवाजांचा किलबिलाट चालू असतो. स्वतःचे मानवनिर्मित जंगल निर्माण होऊन जैव विविधतेची साखळी निर्माण झाली आहे. शिवाजी राजपूत यांनी 32 वर्षापासून लाखो वृक्ष लावून संवर्धन केले आहे व जवळपास 80 लाख रोपे तयार करून लोकांना वृक्षारोपणासाठी उत्तेजित करत ना नफा ना तोटा तत्वावर वितरीत केले आहे.5 लाखाच्या वरती रोपांची मोफत वाटप केली आहे. 38 महिन्यापासून दररोज प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक वृक्ष लागवड करून झाडांना जिवदान देत आहे वृक्षारोपणासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना रोप मोफत देत असतात. त्यांचे हे वृक्षारोपण , संवर्धन व पर्यावरण संतुलन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानिमित्ताने सर्व बाबींचा अवलोकन करून त्यांना वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करीत आर्थिक,सामाजिक समृद्धीची कास धरली आहे त्यांचे हे कार्य राष्ट्राहिता साठी अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून त्यांना राष्ट्रीय कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
