थाळनेरला शेतकऱ्यांना हरभरा व मका पिकावर मार्गदर्शन*




*थाळनेरला शेतकऱ्यांना हरभरा व मका पिकावर मार्गदर्शन* 

थाळनेर(प्रतिनिधी) 

      शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतकऱ्यांना निम्स कॉलेज कृषी महाविद्यालयाच्या *ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम* अंतर्गत हरभरा व मका पिकावर मार्गदर्शन करण्यात आले.
             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी हे होते. *एफएमसी* कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत राजपूत यांनी *हरभरा* पिकातील खत व पाणी व्यवस्थापन,हरभरा पिकातील शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरलेला मर रोग, फुलगळ,हरभरा वाढीच्या अवस्थेतील अळीचे जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रण,उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन आदी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रब्बी हंगामातील *मका* पिकाबाबत शेतकऱ्यांना विविध उत्पन्न देणारे आधुनिक वाणची निवड, पारंपरिक व आधुनिक पद्धतीने लागवड, मका पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाणी व खताचे नियोजन,मका पिकातील अळीचे नियंत्रण याबाबत माहिती देण्यात आली. 
         यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव जाधव,गौरव पाटील,कृष्णा कासार,देवेंद्र देवरे,घनश्याम पाटील आदींनी योग्य मार्गदर्शन करून शंकांचे निरीक्षण केले. 
    या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने