आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा विद्यार्थ्याशी संवाद कौशल्य शिक्षणाला विद्यार्थ्यांनी अधिक प्राधान्य देणे गरजेचे - मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे प्रतिपादन





आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा विद्यार्थ्याशी संवाद  
कौशल्य शिक्षणाला विद्यार्थ्यांनी अधिक प्राधान्य देणे गरजेचे
                          - मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे प्रतिपादन

शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी कौशल्य शिक्षणाला विद्यार्थ्यांनी अधिक प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा. विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे लातूर येथील विभागीय केंद्रात आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) होत्या सवमेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, लातूरचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, लातूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. संतोषकुमार डोपे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवंेद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते.

        विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी समजून त्वरीत अंमलबजावणी करणे शक्य होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ’थिंकिंग बियॉंड’ चा अवलंब करावा. संशोधन हा शिक्षणाचा गाभा समजून अभ्यास करावा. गुणांकणापेक्षा जिज्ञासू वृत्ती वाढवून क्षमता बळकट कराव्यात. सर्व विद्याशाखांचा सर्वागिण विकास होणे गरजेचे आहे यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम रावबविण्यात येतात त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करुन घ्यावा.

      त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या विकसित भारत उपक्रमात युथ इंडिया करीता विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक संकल्पना मांडल्या त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मॉडयुल तयार करुन त्याचा अवलंब करावा. विद्यापीठाने डिजिटल हेल्थ इंडियाच्या माध्यमातून ई-प्रबोधिनी अंतर्गत ऑनलाईन कोर्स सुरु केले आहेत हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचन, धावणे, पोहणे, संगीत आदी कला प्रकारात वीस टक्के वेळ घालवावा जेणेकरुन आपले मानसिक संतुलन ठीक राहण्यास मदत होते. आपले मन आणि शरिर यांचा अंतरिक संबंध असतो त्याची कनेक्टीव्हिटी कायम ठेवा असे त्यांनी सांगितले.

        विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या संकल्पनेनुसार विद्यापीठ आपल्या दारीच्या माध्यमातून मा. कुलगुरु महोदया यांनी राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागात कुलगुरु कट्टाचे आयोजन करण्यात येत आहे. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्वाकांक्षी असावे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांकडून येणारे प्रश्नांवर उपाययोजना शोधणे महत्वपूर्ण आहे यासाठी कुलगुरु कट्टयाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून निराकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असतात त्याबाबत त्यांनी स्थनिक चौकशीत योग्य माहिती दिल्यास विद्यापीठाकडून योग्य कार्यवाही करणे सुलभ होते त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
      कार्यक्रमाच्या सुरवातील विद्यार्थ्यांना ‘वेळेचे व्यवस्थापन’ विषयावर मानसोपचार तज्ज्ञ श्रीमती मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवंेद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना विद्यापीठ परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्याच्या हेतूने कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. कुलगुरु रोपटयाला जलार्पण करण्यात आले. इंद्रधनुष्य 2024 पाश्चिमात्य वाद्यसंगीतात या कलाप्रकारात तृतीय पारितोषिक विजेता देवेश देशपांडे यांचा मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. देवेंद्र पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास मांजरा आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंद पवार, लातूरचे एम.आय.एम.एस.आर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जावेद सिद्दीकी, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. स्नेहल सांगळे, डॉ. रत्नेश्वर धानुरे आदी मान्यवर उपस्थित होते.  वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बाळासाहेब पेंढारकर, डॉ. विमल होळंबे श्री. श्रीधर उरगुंडे, श्री. कृष्णा भुते, श्री. अरुण वाघमारे, श्री. अभिजित साबळे, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी     श्री. अविनाश सोनवणे, श्री. निलेश ओहळ, श्री. अर्जुन नागलोथ, श्रीमती अर्चना निकम, श्री. पुष्कर  तऱ्हाळ, श्री. विनायक ढोले, श्री. रोहित भोये, श्री. सोहम वानेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने