पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक*




*पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक*

*धुळे, दिनांक 27 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) :* राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 1 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नविन नियोजन भवन, धुळे येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी छ. रा. कनगरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 28 जुलै, 2024 रोजी झालेल्या बैठकीमधील इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 (सर्वसाधारण/आदिवासी उपयोजना (टीएसपी) / ओटीएसपी योजना व अनु.जाती उपयोजना या योजनांच्या प्रारुप आराखडयास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2024-25 (सर्वसाधारण/आदिवासी उपयोजना / ओटीएसपी योजना  व अनु. जाती उपयोजना या योजनांचा 20 जानेवारी, 2025 अखेर झालेला खर्चास मान्यता देणे.तसेच आयत्या वेळेचे विषय याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीस संबंधित विभागांनी बैठकीतील विषयांच्या योजनानिहाय सविस्तर माहितीसह सर्व कार्यान्वियीन यंत्रणा व जिल्हा नियोजन समितीचे सन्माननीय सदस्य यांनी बैठक सुरु होण्यापुर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने