*दोंडाईच्यात आज पत्रकारांना हेल्मेट चे वाटप आणि पुरस्कार सोहळा**
**पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम, सायबर तज्ञांचे होणार मार्गदर्शन, उपस्थित राहण्याचे पुजाताई खडसे यांचे आवाहन**
दोडाईचा. (अख्तर शाह)
दोंडाईचा- शहरातील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे आज 10 रोजी पत्रकारांना हेल्मेटचे वाटप आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सायबर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्षा पूजाताई खडसे यांनी केले आहे.
पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असते. नेहमी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. याच उदात्त भावनेने गेल्या तीन वर्षापासून पत्रकारांसाठी पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रा. अनिल चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकारिता , नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना प्रभावी पोलीस अधिकारी, ऍड चैतन्य भंडारी याना सायबर तज्ञ म्हणून तर अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे.
पत्रकार हे बातमी संकलन करण्यासाठी धावपळीचे जीवन जगत असतात. हे लक्षात घेता दुचाकी वर फिरताना हेल्मेट आवश्यक असते. हेल्मेट राहिल्यास अपघाताला आळा बसू शकतो. म्हणून शहरातील पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे . सध्याच्या डिजिटल पत्रकारितेत सायबर अवेअरनेस खूप महत्वाचे आहे. पत्रकारांचा या विषयाशी रोजचाच संबंध येतो. कळत न कळत आपल्या हातून काही चूक होऊ नये, म्हणून यावेळी सायबर तज्ञ ऍड चैतन्य भंडारी हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रम शहरातील सौरभ मंगल कार्यालय येथे दि. १० रोजी संध्याकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सायबर क्राईम ची माहिती घेण्यासाठी जास्तच जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. पूजाताई खडसे यांनी केले आहे.
