**पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उलेखनीय उपक्रम पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना हेल्मेट वाटप**
दोंडाईचा (मुस्तफा शाह)
दोडाईचा येथील पांडुरंग बहुउदेशीय सेवाभावी संस्थेतर्फे १०जानेवारीला सौरभ मंगल कार्यालय येथे दोंडाईच्यातील पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर झेप न्यूज चैनल चे संचालक अनिल चव्हाण, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. हेमंत पाटील, सायबर गुन्हे तज्ञ अँड . चैतन्य भंडारी, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता नितिन खडसे, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. पूजाताई खडसे, खानदेश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, दोडाईचा शहर, ग्रामीण पत्रकार स्थाचे अध्यक्ष टाटीया,सर. जे पी गिरासे डॉ. जयेश ठाकुर, डॉ अनिल धनगर आदि उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात पो.नि. ज्येष्ठ पत्रकार प्रा. अनिल
चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना प्रभावी पोलीरा अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले, तसेच या सोहळ्यात सायबर तज्ञ अँड . चैतन्य भंडारी याना उत्कृष्ट सायबर तज्ञ ने सन्मानित करन्यात आले. अँड चैतन्य भंडारी यानी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की लोकांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत खूप अनभिज्ञता आहे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानी ए.टी.एम
मधून पैसे काढल्यावर पावती घेऊ नये असे आवाहन केले. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की परस्परानवर अवलंबुन असलेले पोलिस, पत्रकार आणि वकील या त्रिसूत्रीचा सत्कार एकाच ठिकाणी करण्यात आला हे आमचे सौभाग्य आहे. प्रास्ताविक मध्ये पुजाताई खडसे यांनी सांगितले की पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असते. नेहमी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. याच उदात्त भावनेने गेल्या तीन वर्षापासून पत्रकारांसाठी पत्रकार
दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. यदाही
पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा माध्यमातुन
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बंधूनचा सत्कार
करुन पेन डाईरी व हेल्मेटचे वाटप करण्यात आले त्याचे कारण असे की पत्रकार हे बातमी संकलन करण्यासाठी धावपळीचे जीवन जगत असतात. हे लक्षात घेता दुचाकी वर फिरताना हेल्मेट आवश्यक असते. हेल्मेट राहिल्यास जीवितहानी टळू शकते . या कार्यक्रमांला पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच दोंडाईचा वकील संघाचे सर्व सदस्य हीं ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सदाशिव भलकार सर यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्या श्रीमती लक्ष्मी ठाकूर, श्रीमती सरिता महाजन यानी परिश्रम घेतले.
