शिरपूर तालुका पोलिसांनी प्रतिबंधित
गुटख्यासह 33 लाख 60 हजार चा मुद्देमाल केला जप्त
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी प्रतिबंधित
गुटख्यासह 33 लाख 60 हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनिय बातमी मिळाली होती की, वाहन क्र. NL 01, AH 5988 हिचेत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखु जन्य पदार्थ भरला असुन सदर वाहन हे दि. 03/01/2025 रोजी रात्री 01.00 वा. पासुन राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील ओम साईराम ढाब्याजवळ संशयास्पद स्थितीत उभे आहे.
सदर बातमीची खात्री करणे कामी पोहेका संतोष पाटील यांचे सोबत इतर स्टाफ यांना रवाना केले. सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साऊद फरमीन खान वय 22 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. सारेकलान ता. तिजारा जि. अलवर राज्य राजस्थान असे सांगीतले.
वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्याने कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे दिली नाही.
सदर वाहनाची तपासणी करणे आवश्यक असल्याने सदरचे वाहन हे पोलीस ठाण्यात आणुन दोन पंचांना बोलावुन त्यांचे समक्ष सकाळी कंटेनर उघडुन पाहले असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत खालील वर्णनाची सुगंधित तंबाखु मिळुन आली ती,
1) 5,40,000/- रु. किमतीचा हंस छाप तंबाखु चे एकूण 4,500 पिवळ्या रंगाचे पॅकेट्, प्रत्येकी किंमत 120/- रुपये प्रमाणे (कागदी खोक्यात पॅक केलेले)
2) 13,20,000/- रु, किमतीचा हंस छाप तंबाखु चे एकुण 11,000 निळ्या रंगाचे पॅकेट्, प्रत्येकी किंमत
120/-रुपये प्रमाणे (खाकी रंगाच्या गोणीत पॅक केलेले)
3) 15,00,000/- रुपये किमंतीची एक टाटा कंपनीचे कंटेनर वाहन NL 01, AH 5988 जु.वा.कि.अं.
एकुण किंमत- 33,60,000/-रुपये
यावावत श्री. आनंद भाऊराव पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म. राज्य) धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. 03/2025 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2) (iv), 27(3)(d), 27(3) (e), 30(2) (a), उल्लंघन कलम 59(1) सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,223,274,275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोसई सुनिल वसावे हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे, श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर, श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, पोसई श्री. सुनिल वसावे, पोहेकॉ/ संतोष पाटील, पोहेकों/ संदिप ठाकरे, पोकों/योगेश मोरे, पोकों/संजय भोई, पोकॉ/ स्वप्निल बांगर, पोकों/ जयेश मोरे, पोकों/ सुनिल पवार, पोकॉ/ भुषण पाटील, चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा, पोकों/ धनराज गोपाळ, पोकों/इसरार फारुकी, पोकों/ सागर कासार यांनी केली.
