शिरपूर शहरात व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सव 2025 चा शुभारंभ
शिरपूर प्रतिनिधी - दरवर्षी सालाबादप्रमाणे शिरपूर तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्था एक डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सव साजरा करत असते.
2025 च्या कला आणि क्रीडा महोत्सव दिनांक एक जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे.
यासाठी दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता भव्य अशा मशाल रॅलीचे आणि मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मशाल रेल्वेची सुरुवात बोराडे येथून करण्यात येऊन वाडी, वाघाडी, निमझरी नाका, करवंद नाका, गुजराती कॉम्प्लेक्स ,पाच कंदील ,एसपीडीएम महाविद्यालय दादासो विश्वासराव रंधे क्रीडा संकुल शिरपूर येथे या मशालीचे रोपण करण्यात आले. किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी सचिव महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर स्मृतीस्थळावर अभिवादन करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती.
राष्ट्रीय राज्य विद्यापीठ स्तरावरील खेळाडूंच्या हस्ते शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर क्रीडा ज्योत चे रोपण करण्यात आले. यानिमित्ताने पांढऱ्या गणवेशात फेटा बांधून मोटरसायकल मशाल रॅली काढण्यात आली रस्त्यातील गावागावात नागरिक व विद्यार्थ्यांनी पुष्पृष्टी करून या क्रीडा ज्योत चे नांदर्डे, वाडी ,वाघाडी ,शिरपूर कॉलेज फाटा, निमझरी नाका, करवंद नाका ,गुजराती कॉम्प्लेक्स इत्यादी ठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर पातळेश्वर मंदिराजवळील वीर स्मारकावर महात्मा फुले विद्यालय व एसपीडीएम महाविद्यालय यांच्या एनसीसी पथकाने श्रद्धांजली अर्पण केली नंतर सौ .सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या ढोल पथकाने रॅलीचे स्वागत केले .शेवटी एस पी डी एम कॉलेज मार्ग शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर रॅलीचे आगमन झाले या प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे ,सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे ,मेळाव्याचे सचिव रोहित रंधे, धुळे नंदुरबार ग.स. बँकेचे संचालक शशांक रंधे, सीमाताई रंधे, सारिका रंधे ,विद्या रंधे, हर्षाली रंधे, रोहिणी रंधे, माजी प्राचार्य बी.डी पाटील ,विनायक देवरे ,नामदेव रोकडे, भाऊसाहेब पाटील, आर एस पाटील, आर बी महाजन, एम एम सनेर,एच, जी.निंबाळकर, विश्वस्त शामकांत पाटील, उद्योजक हर्षवर्धन रंधे, ए ए पाटील, प्राचार्य विकास पाटील, उप प्राचार्य कल्पेश कुमार वाघ ,परिसरातील सर्व शाखांचे शाखाप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी खेळाडू इत्यादी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले.
