शिरपूर तालुक्यात ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करणे बाबत आवाहन




शिरपूर तालुक्यात  ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करणे बाबत आवाहन

शिरपूर - शिरपूर तालुक्यात  रब्बी हंगाम 2024 साठी-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करणे बाबत आवाहन तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासन, कृषी विभाग शासन निर्णय दिनांक १४/१०/२०२४ नुसार  संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. त्यानुसार दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून शिरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने खालील प्रमाणे रब्बी हंगाम २०२४ करिता कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी
१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५

सहाय्यक स्तरावरील इ पीक पहाणी १६ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५

सुरवातीला शेतकरी स्तरावरून Mobile App द्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येते व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी Mobile App द्वारे नोंदवण्यात येते. तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार/सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही म्हणून शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना आवाहन करण्यात येते कि आपली रब्बी हंगामातील पीक पाहणी नोंदविण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना संपर्क करावा.  त्याद्वारे शासनाच्या विविध योजनाचा लाभ शेतकरी यांना देणे सुलभ होणार आहे. 

 करवंद येथे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्फत शेतकरी देवेंद्र पाटील यांच्या शेतात जाऊन रब्बी इ पीक पाहणी नोंद मोबाईल अँप द्वारे करण्यात आली त्यावेळी तलाठी,. मंडळ अधिकारी, व कोतवाल हजर होते . 

तालुक्यातील शेतकऱ्यांनी आप आपली ई  पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी यांनी केले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने