शासनाच्या निर्देशानुसार सुशासन सप्ताह अर्थात प्रशासन गाव की ओर या उपक्रमांतर्गत शिंदखेडा शिक्षण विभाग अंतर्गत 24 तारखेला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादरीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते गटशिक्षणाधिकारी डॉ.सी. के.पाटील यांच्या नियोजनानुसार गट साधन केंद्र शिंदखेडा येथे सदर शिबिरात मुख्याध्यापक/ शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन समाज कल्याण विभागाचे अधिकारी श्री . पावरा साहेब यांचे समवेत 51 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तपासून अंतिम करण्यात आले व समाज कल्याण विभागाकडे त्याच दिवशी समक्ष सादर करण्यात आले.या कामी समग्र शिक्षा अभियान चे तालुका विषयतज्ञ ऋषिकेश वाघ व सर्व विशेषशिक्षक यांनी मुख्याध्यापकांसमवेत सक्रिय कामकाज केले, शिंदखेडा शिक्षण विभागा मार्फत जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ.किरण कुंवर मॅडम शिक्षणाधिकारी(माध्य.) श्री.मनीष पवार साहेब, गटविकास अधिकारी श्री.आर.डी.वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील यांचे सुयोग्य नियोजनानुसार सुशासन सप्ताह यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला यात विद्यार्थी सुरक्षितता, विशाखासमिती, विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी,मासिक पाळी व्यवस्थापन,पोलीस दादा पोलीस दीदी यांचे मार्गदर्शन,महिला सुरक्षिततेबाबत कायदेविषयक मार्गदर्शन, मातापालक गट बैठका, विविध संस्था,कारखाने , पोस्ट ऑफीस, ग्राम पंचायत,गावातील शासकीय कार्यालय यांच्या क्षेत्रभेटी,शालेय आवार,परीसर स्वच्छ्ता/सफाई, परस बाग निर्मिती, सकस पोषण आहार, स्नेह भोजन इत्यादी उपक्रम तसेच प्रशासन विषयक कामकाजाचे संदर्भात चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,यांचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात आले असून यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक, पालक ,विध्यार्थी यांचे कडून सक्रिय प्रयत्न करण्यात आले,गावातील सामाजिक घटकांचा सहभाग घेऊन सुशासन सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्याचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे,त्यानुसार सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये विविध उपक्रमातून यशस्वी उपक्रम राबविले जात आहेत,यासाठी स्वतः गट शिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील,गट समन्वयक श्री,चुडामण बोरसे, शिक्षण विस्तार अधिकारी डी एस.सोनवणे, सौ.एस.आर.शिंदे, श्री.सी.एस.खर्डे,केन्द्रप्रमुख श्री. संतोष चौधरी, श्री.पद्माकर सांगळे,श्री. राजु राजपूत, सर्व बीआरसी कर्मचारी, प्रयत्नशील आहेत.
