जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवता जागृती रॅलीचे आयोजन*




*जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवता जागृती रॅलीचे आयोजन*


 पिंपळनेर - येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अखिल भारतीय मानवाधिकार  संघाचे राज्य समन्वयक मा. श्री. कांतीलालजी जैन साहेब व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा. श्री.सुभाषजी बसवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त *मानवता जागृती रॅलीचे*  आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रॅलीचे उद्घाटक म्हणून श्री. कांतीलालजी जैन साहेब, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पी एस आय मा. शेवाळे साहेब, कर्म.आ.मा पाटील चे प्राचार्य मा.श्री. पी एच पाटील सर ,माजी प्राचार्य मा. श्री.ए बी. मराठे सर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिभाताई चौरे,जेष्ठ पत्रकार मा. श्री.एच डी पाटील सर, इत्यादींचा सत्कार शाल ,श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. उद्घाटक यांनी भगव्या ध्वजा द्वारे मानवता जागृती राहिलेला मार्गस्थ केले. व पिंपळनेर शहरात रॅलीच्या माध्यमातून मानवी हक्कांची जनजागृती करण्यात आली.
 या प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात, ज्येष्ठ पञकार श्री. एच डी पाटील सर व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रतिभाताई चौरे, यांनी विद्यार्थ्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हंसराजजी दादा शिंदे, श्री. रावसाहेब शिंदे ,श्री.अनिल महाले, श्री. भरत बागुल ,श्री. दिनेश भालेराव, श्री. चंद्रकांत आहिरराव ,सौ.भिमाताई गांगुर्डे, श्री. किरण शिनकर,श्री. धनंजय देवरे ,श्री. अरुण गांगुर्डे ,श्री. पराग महाजन, श्री. सोमनाथ बागुल, श्री. राजेंद्र एखंडे, श्री. फत्तेसिंग राजपूत व कर्म. आ.मा. पाटील विद्यालयाचे शिक्षक श्री डी एन बर्डे सर , श्री एम जी नंदन सर व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे विशेष सहकार्य लाभले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए बी महाले सर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने