शिरपूर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या* *ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 24 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत*




*शिरपूर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या*
*ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 24 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत*

  धुळे, दिनांक 18 डिसेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामविकास विभागाकडील अधिसूचनेनुसार सन 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 17 मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांच्या मागासप्रवर्ग व महिलांसाठी सरपंच पदांचे 50 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार, 24 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार महेंद्र माळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  शिरपूर तालुक्यातील भोरटेक, आढे, जैतपूर, पिंप्री, सावेर-गोदी, पिळोदा, जापोरा, वनावल, रुदावली, सुभाषनगर, अजंदे खु. नवे भामपूर, तऱ्हाडी त.त., अहिल्यापूर, टेंभे बु, भरवाडे, चांदपूरी या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व आजी व माजी जि.प/पंचायत समिती सदस्य, ग्रामंचायत सदस्य, राजकीय पक्ष प्रमुख, ग्रामस्थ यांनी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे उपस्थित रहावे,  असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने