शहादा लग्न समारंभातून चोरीस गेलेले 18 तोळे सोने जप्त करण्यास पोलिसांना यश
मध्यप्रदेशातील कुख्यात गॅंगवर कारवाई
शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा शहरातील बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभ मध्ये झालेले चोरी चा गुन्हा शहादा पोलीस कडुन उघडकीस चोरीस गेलेला ७,२०,०००/-रूपये किंमती चे दागिने मध्यप्रदेश राज्यातील राजगढ जिल्यातील आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गैंग टोळी विरूध्द कार्यवाही करून १८ तोळे सोने जप्त करण्यात शहादा पोलिसांना यश आले आहे. या तपास पथकाचे जिल्हाभरातून विशेष कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक. २२/११/२०२४ रोजी फिर्यादी नामे रोहनसिंग मोहनसिंग राजपुत वय ३८ वर्षे धंदा-शिक्षक रा. प्लॉट नंबर २४ विद्यानगर सिध्देश्वर मंदीरा जवळ दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे यांचे मोठे भाचे लग्न समारंभा करीता शहादा येथील वालाजी लॉन्स या ठिकाणी आले होते त्यांची बहिणयांनी सोन्याचे दागिने असलेली पर्स फोटो काढते वेळी खुर्ची वर ठेवली असता ती सोन्याचे दागिने आणि नगदी रूपये व दोन वन प्लॅस कंपनीचा नॉर्ड CE 3 Lite 5 मॉडेलचा व रेडमी कंपनीचे मोबाईल असे एकूण ९,३४,०००/- चा असलेली पर्स ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे शहादा येथे फौज गुन्हा ६७३/२०२४ भा. न्याय, संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३ (५) प्रमाणे दाखल असुन तपासवर आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधिक्षक साहेब नंदुरबार यांनी गुन्हयाचे तपास कामी सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणण्या बाबत शहादा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांनी आदेशीत केले असता सपोनि राजन मोरे यांनी त्याचे अधिनीस्त एक पथक गठीत करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले असता तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे गोपनिय माहिती काढत असतांना मा. पोलीस अधिक्षक श्रावण दत्त सो, नंदुरबार यांना गोपनिय माहिती मिळाली की लग्न समारंभात चोरी करणारे गैंग ही मध्यप्रदेश राज्यातील राजगढ जिल्यातील आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गैंग असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहिती शहादा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि / राजन मोरे यांना कळवुन पथकास योग्य त्या सुचना देवुन तपास कामी रवाना करणे बाबत आदेशित केले असता पथकातील अधिकारी व अंमलदार सपोनि/प्रतापसिंग मोहिते, सपोउपनि/प्रदिपसिंग. डी. राजपुत, पोहवा /योगेश थोरात, पोकों/दिनकर चव्हाण पोकॉ/१७३ भरत उगले यांना मध्यप्रदेश येथील राजगढ कडे रवाना केले असता पथकाने आरोपी नामे १) रितेश प्रभात सिसोदिया रा. गुलखेडी ता.पचोर.जि.राजगढ (म.प्र) २) बाबु विक्रम सिसोदीया रा. कडिया ता.पचोर.जि.राजगढ (म.प्र) ३) जुही बालकिशन सिसोदिया रा. कडिया ता. पचोर.जि. राजगढ (म.प्र) यांचा त्यांचे राहते घरी व गावात सतत ७ दिवस शोध घेतला असता ते मिळुन आले नाही सदर आरोपी ची सावत्र आई ममताबाई पर्वत सिसोदिया वय ५० वर्षे रा. गुलखेडी ता. पचोर जि. राजगढ (म.प्र) हिचे कडेस सदर गुन्हयातील चोरील गेलेला मुद्देमाल बाबत विचारपुस करता तिचे कडुन चोरीस गेलेला एकुण कि.अं ७,२०,०००/- रूपये हस्तगत करण्यात शहादा पोलीस येथील पथकास यश आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा भाग शहादा श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ श्री. राजन मोरे, सपोनि / प्रतापसिंग मोहिते सपोउपनि / प्रदीपसिंग राजपुत, पोह/योगेश थोरात, पोशि/ दिनकर चव्हाण, पोशि/ भरत उगले, यांचे पथकाने केली आहे.


