आ.काशिराम पावरा यांच्या सारख्या सात्विक माणसाची राजकारणात गरज आहे : संगमलाल गुप्ता.
शिरपूर : आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांचे कार्य महान असून त्यांनी शिरपूर आमदार कार्यालय मार्फत सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेले अभियान खूपच कौतुकास्पद आहे. यासाठी 120 खाजगी कर्मचाऱ्यांसाठी दरमहा 20 लाख पगार खर्च करण्यात येतो, ही संपूर्ण देशात अभिमानास्पद बाब आहे. आ.काशिराम पावरा यांच्या सारख्या सात्विक माणसाची राजकारणात गरज आहे. त्यांना मंत्री करण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करु. देशात 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांती आणली. असंख्य विकासकामे केली. त्यांनी ओबीसी व सर्व जाती जमातीच्या विकासासाठी काम केले आहे. शिरपूरच्या या दोन आमदारांची पक्ष व सरकारला देखील गरज आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास फक्त भाजपा करु शकतो.
लाडकी बहीण योजना व अनेक योजना यशस्वीपणे सुरु आहेत. विरोधक उमेदवाराची डिपॉजिट जप्त व्हावी, असे काम मतदारांनी करावे. भाईंनी शिरपूर तालुक्यात पाणी, रोजगार, शिक्षण, मोठे कार्य केले आहे. देशात भाईंचा विशेष सन्मान आहे. भाई व दादा यांच्यावर जनतेचे विशेष प्रेम दिसून येते. मतदार आमच्यासाठी देवता आहे. भाजपा सरकारने केलेल्या घोषणा नुसार सर्वत्र आतापर्यंत पूर्तता केली आहे. लवकरच होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ दर्शनाला या असे आवाहन देखील ओबीसी राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी संगमलाल गुप्ता यांनी केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशिराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ वाघाडी, शिंगावे या दोन जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची जाहीर सभा जनक व्हीला आमदार निवासस्थान येथे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, शिरपूर तालुक्यातील जनता सुखी, संपन्न व्हावी यासाठी आपण गेल्या 35 वर्षांपासून तालुक्याला जिवापाड जपले आहे. मी व दादांनी जनतेची मनापासून सेवा केली आहे. हजारो युवकांना रोजगार देण्याची व्यवस्था करतोय. आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी, नवीन पिढी साठी मोठी व्यवस्था निर्माण केली आहे. शिरपूर पॅटर्न अंतर्गत 386 बंधारे झाले, येत्या काळात अजून 350 बंधारे तयार करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी. ची मागणी पूर्ण केली असून हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 1 हजार बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरु करुन कमी खर्चात आरोग्य सेवा देणार आहोत. आमदार कार्यालयात जनतेसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. आ. काशिराम दादा पावरा हे प्रामाणिक व निष्कलंक असून अशा नेत्याचे जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भाईंनी केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा राष्ट्रीय ओबीसी महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी, उ. प्र. माजी खासदार संगमलाल गुप्ता, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र प्रभारी मनोज ब्राह्मणकर, भाजपा प्रवासी नेता दिपक देसाई नवसारी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी प्रदेश सचिव श्यामकांत ईशी, कारखाना चेअरमन माधवराव पाटील, शशिकांत पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष दिपक गुजर, जि. प. सदस्य सकुबाई पारधी, विजय पारधी, मनसाराम भिल, बाजार समिती संचालक डॉ. किरण गुजराथी, छगन गुजर, बन्सीलाल पाटील, पप्पू पाटील, हेमराज पाटील, कवरदास पाटील, किसन पाटील, बबन भिल, मनोहर पाटील, प्रविण पाटील, विनायक सूर्यवंशी, लक्ष्मीकांत पाटील, नामदेव महाराज चौधरी, सुभाष कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि. का. सोसायटी पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
