शिरपूर विधानसभा निवडणूक प्रचारात पक्ष आणि अपक्षांची आघाडी ,
एक उमेदवार जनता दरबारात, तर एका उमेदवाराच्या दरबारात जनता
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराने आता वेग घेतला असून या निवडणुकीत तालुक्यात चौरंगी लढत होताना दिसत आहे. प्रमुख सत्ताधारी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमदार काशीराम पावरा यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. बुधा मला पावरा, अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर, बहुजन समाजाच्या उमेदवार आणि इतर अपक्ष उमेदवार अशीही लढत तालुक्यात होताना दिसत आहे.
यात प्रामुख्याने मुख्य लढत ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच होताना दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुढे अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर हे एक मोठे आव्हान आहे.पक्ष आणि अपक्ष यांच्या यांच्या लढतीकडे आता जिल्ह्याचे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.
निवडणूक आली की प्रचाराला, मतदारांची विनंती आली, आणि मतदारांना मायबाप असे म्हणत साध घातली जाते. विनंती केली जाते. मात्र शिरपूर तालुक्यात काहीशी विपरीत परिस्थिती दिसून येत आहे.
एकीकडे अपक्ष उमेदवार शिरपूर तालुक्यात आपल्या प्रचारात आघाडी घेताना गावोगावी घरोघरी दारोदारी जाऊन मतांची भीक मागत आहे. मागील तेरा वर्षात आपण केलेल्या संघर्षाची आठवण लोकांना करून देत आहे. ही निवडणूक फक्त जितेंद्र ठाकूर लढत नसून ही निवडणूक तुम्ही लढत आहात मी तुमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जर मी निवडणूक लढली नसती तर कदाचित तुमच्या मतदानाच्या हक्क देखील हिरावून घेतला गेला असता. लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण मला मतदान करा, तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, त्यासाठी मी एक वचननामा दिला आहे अशा प्रकारच्या प्रचार अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्याकडून केला जात आहे.
तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आमदार अमरीश भाई पटेल यांनी सांभाळले असून , त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ,असो किंवा त्यांना आता जास्त बाहेर फिरणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्या प्रचाराची धुरा ही आपल्या कार्यालयातूनच सांभाळले आहे.
शिरपूर तालुक्यातील अनेक समाज गट यांच्या स्वतंत्र बैठका या आमदार निवासावर घेतला जात आहेत. येथूनच नागरिकांना मतदानासाठी साद घातली जात आहे. आज पर्यंत आपण केलेला विकास आणि यापुढे विकासाचे विजन लोकांसमोर मांडले जात आहे. आणि तालुक्याच्या या पुढील सर्वांगीण विकासासाठी आ.काशीराम पावरा यांना मतदान करा असे आवाहन केले जात आहे.
मात्र तालुक्यात सुरू असलेल्या या प्रचार तंत्राबाबत सोशल मीडियातून मात्र फार मोठे युद्ध पेटले आहे. तालुक्यातील जनता आता मुक्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यात अनेकांनी समाजांना आणि गटांना आमदार कार्यालयात बोलावून बैठका घेण्यावर आपले मत व्यक्त केले आहे. आणि या कृतीच्या विरोध देखील केला आहे. अनेक लोकांच्या मते देशात लोकशाही आहे त्यामुळे उमेदवाराने प्रत्येक गावात जाऊन त्या चौकात जाऊन मतदाराला भेटले पाहिजे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत, आणि त्यांना विश्वास दिला पाहिजे, आमदार भाईंना जरी शक्य नसेल तरी आमदार काशिराम पावरा आणि त्यांचे सहकारी तालुका भरात तिच्या मतदारांशी संवाद साधू शकतात.
मात्र तसे न करता ते आमदार अमरीशभाई पटेल यांच्यावर विसंबून सर्व प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. मतदार या विषयावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणून सध्या सोशल मीडियावर शिरपूर तालुक्याच्या प्रचाराबाबत एक नवीन ट्रेड सुरू आहे आणि त्याच्या विषय आहे एक उमेदवार जनता दरबारात, तर एका उमेदवाराच्या दरबारात जनता .
निवडणूक प्रचाराच्या एक संपूर्ण आठवडा अजून शिल्लक आहे. त्यामुळे या प्रचारात नेमकं कोण आघाडी घेतो ते लवकरच समोर येईल. मात्र भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष उमेदवार यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची होणार आणि निकाल धक्कादायक असणार असे संकेत सध्यातरी जनतेतून मिळत आहेत.
