अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर परिवर्तन यात्रा निमित्त जनसंवाद, तालुक्यातील मूलभूत प्रश्नांवर तरुणांशी संवाद





अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर परिवर्तन यात्रा निमित्त जनसंवाद, तालुक्यातील मूलभूत प्रश्नांवर तरुणांशी संवाद 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पक्ष आणि अपक्षांच्या उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फायरिंग होत आहेत. एकमेकांच्या विकास, आणि कर्तुत्व यावर चर्चा होत आहे. 

सत्ताधारी आमदारांकडे सत्ता असल्याने त्यांच्याकडे सांगण्यासाठी  विकास कामांचा लेखाजोखा आहे. शिवाय त्यांच्याकडून अपक्ष उमेदवाराला प्रतिप्रश्न केला जात आहे ही तालुक्यासाठी तुमचे योगदान काय ?

तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी देखील तालुक्यात आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून दररोज तालुक्यातील विविध भागात जाऊन ते आपल्या प्रचार करत आहेत आणि ज्यांना संवाद साधत आहेत. आपल्या प्रचाराचे कोणतेही मोठे आश्वासन देत नसून तालुक्यातील मूलभूत प्रश्नांना हात घालत आहेत. सामान्य माणसाच्या आजच्या गरजा कोणत्या , तालुक्यात आज मूलभूत प्रश्न कोणते ? यावर ते भाष्य करत आहेत. काल त्यांनी तालुक्यातील तोंदे, तरडी , बभळाज, अजनाड, नागेश्वर, भाटपुरा ,सावेर, गोदी, अहिल्यापूर, भोरखेडा ,असली, तांडे या गावांना प्रचार फेरी पूर्ण करून मतदारांची भेट घेतल्यानंतर शेवटी त्यांनी तालुक्यातील दहिवद या गावाला भेट देऊन तरुणांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. या तालुक्यात शेतकऱ्यांचे हिताचे प्रकल्प कसे
 कटकारस्थान करून बंद पाडण्यात आले याच्या त्यांनी समाचार घेतला. शिरपूर साखर कारखाना कसा करून बंद करण्यात आला,तालुक्यातील सहकारी सूतगिरणी कशा पद्धतीने खाजगीकरण करून बंद पाडण्याच्या डाव रचण्यात आला याच्याही त्यांनी आढावा घेतला. सूतगिरणीतील आर्थिक भ्रष्टाचार, जमिनीची हेराफेरी, शेतकऱ्यांनी कष्टकरांचे अडकलेले पैसे, न्यायालयीन लढा इत्यादी बाबत त्यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर राजकीय कटकारस्थान करून नेहमीच मला दूर करण्याचा प्रयत्न होतो,रोजगाराच्या नावाने या तालुक्यातील युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू असून अल्प पगारात काम करून त्यांची पिळवणूक केली जात आहे.ही पिळवणूक थांबवण्यासाठी तालुक्यात एमआयडीसी सारखा प्रकल्प राबवणे गरजेचे आहे असे देखील मत त्यांनी व्यक्त केले. तालुक्यात मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत मात्र त्यात शिक्षण घेणे सामान्यांच्या मुलांना परवडत नाही, तुमच्या गावाजवळ असलेल्या मोठ्या मिलिटरी स्कूलमध्ये तालुक्यातील किती गरीब मुलांना ऍडमिशन मिळाल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला विचारला.

मला नेहमी प्रश्न विचारला जातो की तुमचे तालुक्यासाठी योगदान काय ? पण मी कोणत्याही पदावर नसताना आणि सत्तेत नसताना देखील शिरपूर शिरपूरच्या बस स्थानकासाठी निधी मंजूर करून आणला. काही रस्त्यांसाठी देखील मी निधी मंजूर करून आणला, तालुक्यातील घोळसगाव येथील शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून लढा उभा केला, शेतकऱ्यांना पादचारीच्या मोबदला मिळवून दिला, कोरोना काळात देखील मी मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील नागरिकांची वैद्यकीय मदत केली, तरी मला कोणतेही सत्ता किंवा पद नसताना तालुक्यासाठी योगदान विचारले जाते. मात्र आपण सेवेची संधी दिल्यास मी यांच्यापेक्षा नक्कीच जास्त काम करून दाखवेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवाय मी मागील तेरा वर्षांपासून तालुक्याच्या हक्कांसाठी जनतेसोबत उभे राहून संघर्ष करत आहे, त्यामुळे शिरपूर तालुक्याला भविष्यात तुम्हाला सुशिक्षित आमदार हवा की अशिक्षित आमदार हवा हे ठरवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. आमदारांचा आवाज हा सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी  असला पाहिजे, विधानसभेत त्याने तालुक्याच्या प्रश्नांसाठी आपला आवाज अभ्यासपूर्ण रित्या मांडण्यासाठी तालुक्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे
त्यामुळे आपण एक वेळा मला  संधी द्या अशी विनंती त्यांनी केली. आणि माझी उमेदवारी ही तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे, स्वाभिमानासाठी आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासोबत दहिवद आणि गाव परिसरातील नागरिकांच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या. ग्रामस्थांनी गावातील स्थानिक राजकारणामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुलांपासून वंचित रहावे लागले असून हा आमच्यावर अन्याय आहे अशी भावना बोलून दाखवली. 

त्यामुळे गावोगाव यांनी घरोघरी जाऊन प्रचार करून, जनतेशी आणि युवकांची संवाद साधण्याचे काम अपक्ष उमेदवार यांच्याकडून होत असून जनतेतून देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या प्रचार फेरी दरम्यान गावोगावी त्यांचे नागरिकांकडून स्वागत होत असून विविध ठिकाणी माता आणि भगिनींकडून औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले जात आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद असून मला काम करण्याची बळ देते. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला तर विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

त्यामुळे तालुक्यात एकीकडे हायटेक प्रचार केला जात आहे तर दुसरीकडे कोणत्याही मोठ्या सभा न घेता थेट जनता दरबारात जाऊन कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील जनता या निवडणुकीत कोणाला राजकीय आशीर्वाद देऊन मतदान देईल  याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने