*धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात*
*प्रत्येकी एक महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र राहणार*
धुळे, (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक महिला, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणी येवू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे जिल्हा प्रशासन सर्व तयारी करीत आहे. आयोगाच्या सुचनांप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महिला, एक युवा तर एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रात एकूण 5 महिला, 5 युवा व 5 दिव्यांग असे एकूण 15 विशेष मतदान केंद्र राहणार आहे. महिला मतदान केंद्रावर मतदान अधिकारी पासून सर्व कर्मचारी हे महिला, युवा मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे युवा राहणार असून दिव्यांग मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी राहणार आहेत. हे या मतदान केंद्रांचे वैशिष्ट असणार आहे.
*जिल्ह्यात याठिकाणी राहणार महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद*
*महिला मतदान केंद्र* - साक्री - न्यु इंग्लीश स्कुल, जुनी बिल्डींगमधील पूर्व बाजूची खोली
धुळे ग्रामीण - जिल्हा परिषद शाळा, नुर नगर पूर्व बाजूची खोली
धुळे शहर - शासकीय विद्यालय शाळा, गरुड शाळा, रुम नं. 1
शिंदखेडा - उज्वल प्राथमिक शाळा, जाधव नगर, पश्चिम बाजूची खोली,
शिरपूर - जिल्हा परिषद शाळा, मांडळ, पश्चिम बाजूची खोली
*दिव्यांग मतदान केंद्र* - साक्री - न्यु इंग्लीश स्कुल, जुनी बिल्डींगमधील उत्तर बाजूची खोली
धुळे ग्रामीण - चावरा इंग्लीश मिडीयम स्कुल रुम नं. 2
धुळे शहर - सातपुडा विद्यालय, प्राथमिक आश्रमशाळा, नगांवबारी, देवपूर
शिंदखेडा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाठण रुम नं. 5
शिरपूर - आर. सी. पटेल इंग्लीश मिडीयम स्कुल, शिरपूर
*युवा मतदान केंद्र* - साक्री - न्यु इंग्लीश स्कुल, साक्री
धुळे ग्रामीण - एस. आर. पाटील विद्यालय, रुम नं. 5, वलवाडी
धुळे शहर - जे. आर. सिटी हायस्कुल, रुम नं. 2
शिंदखेडा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाठण रुम नं. 3
शिरपूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंटावद, रुम नं. 2
