विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी दत्त मंदिरात नारळ वाढवून केला प्रचाराचा शुभारंभ




विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी खर्दे येथील श्री दत्त मंदिरात नारळ वाढवून केला प्रचाराचा शुभारंभ 




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना काल उमेदवारी चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खर्दे येथील श्री दत्त मंदिरात आपल्या समर्थकांसह जाऊन दत्तप्रभू चे दर्शन घेत आपल्या प्रचाराच्या नारळ वाढवला आणि विजयाची कामना केली. यावेळी त्यांनी गावातील सर्वच धार्मिक स्थळांवर जाऊन पूजन केले तसेच गावातील राष्ट्रपुरुषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.


यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. या नंतर त्यांनी शिंगावे ,हिंगोनी, बोरगाव, जातोडा , रुदावली, बाळदे, उपपरपिंड, वणावल, टेकवाडे, खामखेडा,भरवाडे, चांदपुरी, इत्यादी गावांना भेट देऊन मतदारांची भेट घेऊन प्रचार दौरा आयोजित केला आहे.

त्यामुळे शिरपूर तालुक्यात आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरू झाली असून निवडणूक आता रंगात आली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने