नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी डॉक्टर रामकृष्ण चव्हाण यांची निवड
नंदुरबार प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक सुरू असताना विविध राजकीय पक्ष आपल्या पक्षाची बांधणी व कार्यकर्त्यांची निवड जाहीर करत आहेत. नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी डॉक्टर रामकृष्ण बी. चव्हाण (डॉक्टर राम गिरासे) यांची पक्षाकडून नियुक्त करण्यात आली आहे.
त्यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की युवक काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काँग्रेस पक्षाचे सातत्याने व प्रामाणिक पणे कार्य काम करीत आहात. पक्षाचे विचार, ध्येय व धोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण जिद्दीने व निष्ठेने करता याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणुन आपली युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
यापुढे युवक काँग्रेस पक्षाच्या विचाराने सर्वसामान्यसाठी पक्ष कार्य करावे व आपल्या जिल्हात पक्षाची प्रतिमा उज्वल करावी ही सदिच्छा व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सदरची नियुक्ती जिल्ह्याचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली आहे.
त्यांच्या यशस्वी निवडीबद्दल माजी आदिवासी मंत्री आ. ऍडव्होकेट के सी पाडवी यांनी त्यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन दिले असून युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश किशोर निकम (विक्की पाटील) यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉक्टर रामकृष्ण चव्हाण यांनी देखील आपण पक्षासाठी एकनिष्ठतेने आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.
