तर आ.काशीराम पावरा यांची उमेदवारी रद्द करा उमेदवार खर्च तपशीलावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार




तर आ.काशीराम पावरा यांची उमेदवारी रद्द करा 

उमेदवार खर्च तपशीलावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार


शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आ.काशीराम पावरा यांच्या निवडणूक खर्चाची नोंद नियमानुसार घेऊन त्यांनी निर्धारित नियमाच्या पेक्षा अधिक खर्च केला असल्यास किंवा असे सिद्ध झाल्यास त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बुधा मला पावरा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे. 

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की मी बहुधा मला पावरा रा. हिसाळे  महाविकास आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून माझ्या विरोधात उभे असलेल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. काशीराम पावरा यांच्या प्रचार सभेच्या, मोटर सायकल रॅली, निवडणूक प्रचारात वापरली जाणारी वाहने, यांच्या आपल्या शासकीय प्रतिनिधी मार्फत निरीक्षण करून आणि व्हिडिओ चित्रीकरण करून खर्चाचा तपशील नोंद करण्यात यावा. 

सदरच्या उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणावर सभा, व रॅली आयोजित करण्यात येत आहेत. मोठे मोठे बॅनर्स द्वारे जाहिराती करण्यात येत आहेत, आमदार अमरीशभाई पटेल यांच्या बंगल्यात यांच्या सर्व सभा होत असून, त्या देखील खर्चाची नोंद घेण्यात यावी, प्रचारात फिरणाऱ्या गाड्यांच्या ताफा, कार्यकर्त्यांच्या खर्च, इत्यादी सर्व निवडणूक खर्चा बाबत शासकीय प्रतिनिधीं मार्फत नोंद घेण्यात येऊन तो सर्व खर्च निवडणूक खर्चात टाकण्यात यावा. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला 40 लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा असून सदरच्या उमेदवार हा निवडणूक प्रचारात पैशांची उधळपट्टी करत आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणूक खर्च 40 लाखापेक्षा अधिक सिद्ध झाल्यास त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आली आहे. 

यावर आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात किंवा काही तपशील सादर करतात याकडे या राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने