नंदुरबार विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवारांच्या बोलबाला अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांना मतदारांच्या उस्पुर्त प्रतिसाद नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे -




नंदुरबार विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवारांच्या बोलबाला 

अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांना मतदारांच्या 
 उस्पुर्त प्रतिसाद 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे -

नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा 03 या मतदारसंघात पक्ष विरोधात अपक्ष असा सामना रंगला असून विधानसभा निवडणुकीत सर्वांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 

भारतीय जनता पार्टी ,काँग्रेस यांच्या यांच्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून रवींद्र वळवी यांनी देखील एक मोठे आव्हान उभे केले आहे. वडवी यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात तापी पट्ट्यात झंजावाती प्रचार दौरा सुरू केला असून त्यांना देखील मतदारांच्या उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपला विजयाच्या विश्वास व्यक्त केला आहे.

या मतदारसंघात सातत्याने भाजप आणि काँग्रेस यांचे वर्चस्व राहिले असून जनता आता या दोन्ही पक्षांना कंटाळली आहे. यांच्या कार्यकाळात प्रचंड प्रमाणात घराणेशाही आणि भ्रष्टाचार झाल्याने या पक्षांवर जनतेची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे मोठ्या पक्षांवर आता जनतेच्या विश्वास राहिला नाही. त्यामुळे सामान्य उमेदवाराला जनता पसंती देत आहे असे देखील चित्र निर्माण होताना दिसत आहे. 

विशेष म्हणजे या निवडणुकीत अजून पर्यंत भारतीय जनता पार्टी अथवा काँग्रेस कडून उमेदवाराकडून या मतदारसंघात जाहीरनामा लोकांपर्यंत मांडण्यात आला नाही. फक्त तोंडी स्वरूपात भाषणातून त्यांना आश्वासने दिली जात आहेत. या गोष्टीवर देखील मतदारांनी अविश्वास व्यक्त केला असून जर अपक्ष उमेदवार आपला वचननामा देऊ शकतो तर मग राष्ट्रीयकृत पक्षांचे उमेदवार आपला जाहीरनामा का देऊ शकत नाही असा सवाल ते आता उमेदवारांना विचारत आहे. 

त्यामुळे फक्त सत्ता आणि पैशाच्या जोरावर आता निवडणुका होणार नाही तर या निवडणुका लोकशाही मार्गाने स्वच्छ आणि प्रामाणिक चरित्राच्या उमेदवारांची निवड मतदारांकडून होऊन या मतदारसंघात जनता परिवर्तनाच्या बाजूने आहे अशी चित्र दिसत आहे. 

राष्ट्रीय पक्षांसोबत या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी देखील आपल्या प्रचारात बढत घेतली असून त्यांनी सामान्य मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अपक्ष उमेदवार थेट मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेत आहेत. आणि त्या सोडवण्याच्या त्यांना विश्वास देत आहे. मोठ्या पक्षांच्या उमेदवारांपर्यंत मतदाराला संवाद साधता येत नाही. मात्र अपक्ष उमेदवार थेट मतदारांच्या दारावर जाऊन आपला प्रचार करत असल्याने ते थेट मतदारांशी संवाद साधत आहे. 

या सर्व प्रचार फेरीत उमेदवारांना येणारे अनुभव, मतदारांची साथ, मतदारांच्या अपेक्षा, मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांवरील नाराजी, पक्षांवरील नाराजी, मतदारसंघातील भ्रष्टाचार आणि घराणेशाही याला कंटाळून जनता आता अपक्ष उमेदवारांना प्राधान्य देताना दिसत आहे. आणि त्यामुळेच अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत विजयाच्या विश्वास आहे. 

जनतेची अशीच साथ आणि प्रतिसाद आम्हाला लाभत असल्यास आमच्या विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांनी दिली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने