स्व. चंदन आबा यांच्या पुण्यस्मरण निमित्त भव्य आरोग्य शिबिर
आरोग्य शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील माजी नगरसेवक , एक सच्चा जनसेवक , स्पष्टवक्ता, निडर आणि निष्पक्ष नेता म्हणून जनमानसात प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय चंदन सिंह राजपूत यांचे तृतीय पुण्यस्मरण दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी असल्याने त्यांना आवडत असलेली गोरगरिबांची सेवा हा त्यांच्या आवडता उपक्रम यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने राबविला जात आहे.
मरावे परी किर्तीरुपी उरावे असे काम आपण आपल्या आयुष्यात केले,आयुष्य जगतांना असे जगावे त्याची तर एक उत्तम उदाहरण आहेत.
असे लोकप्रिय, स्वाभिमानी, सामाजिक बांधिलकी जपणारे, स्पष्टवक्ता, सामान्य जनतेचे कैवारी, प्रतिष्ठित, नामी किर्तीवन्त व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चंदन आबा यांचे व्यक्तिमत्त्व होते.
दिनांक 2 नोव्हेंबर 2024 सकाळी 11 वाजता गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटल निमझरी नाका या ठिकाणी लहान बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वर्गीय चंदन आबा यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिराच्या लाभ तालुक्यातील गरजू लोकांनी लाभ घ्यावा व लहान बालकांची तपासणी मोफत करून घ्यावी असे आवाहन गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर दीपक गिरासे, चंदन आबा युथ फ्रेंड सर्कल, नेताजी केबल नेटवर्क, मित्रपरिवार आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.
यानंतर गरजूंना दिवाळीच्या फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार असून मित्र परिवारातर्फे सामूहिक श्रद्धांजली देखील देण्यात येणार आहे.

