मतदानाच्या काही तास आधी शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनास लक्ष्मी दर्शन थाळनेर पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा जप्त




मतदानाच्या काही तास आधी शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनास लक्ष्मी दर्शन

थाळनेर पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा जप्त

शिरपूर प्रतिनिधी - राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या तपासणी एका कंटेनर ची तपासणी करण्यात आली त्यात जवळपास 94 कोटी 68 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा असल्याचे दिसून आले. यानंतर पथकाने या मुद्देमालाच्या कायदेशीर कागदपत्र ताब्यात घेऊन वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. आणि आता पुढील तपास केला जात आहे.




शिरपुर धुळे जिल्हाभरात मतदान उत्साहात सुरू असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी तालुक्यातील भावेर फाटा येथे पहाटे ५ वाजता एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात १० हजार किलो चांदीच्या वीटा मिळाल्या आहेत. ३० किलो चांदीची एक वीट अशा ३३६ विटा आहेत. त्याची किंमत ९४ करोड ६८ लाख रुपये इतकी आहे. याबाबत माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या मुद्देमालाची काही कायदेशीर कागदपत्रे आणि बिले देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यानुसार हमाल अधिकृत कोणाच्या याबाबत तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात
हा माल एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तरी देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबतच्या सखोल तपास केला जात  असून तपासा अंती  योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने