शिव महापुराण कथेसाठी शिरपूर नगरी सज्ज
60 एकर मध्ये शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन
लाखो भाविकांच्या उपस्थितीत भरणार शिवभक्तांच्या मेळा
शिरपूर जी धुळे शहरात जगद्विख्यात पंडित प्रदीप जी मिश्रा सिहोर वाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर 2024 या काळात होणार असल्याचे शिव महापुराण उत्सव समिती शिरपूर तर्फे श्री हेमंत पाटील,श्री प्रसाद पाटील श्री रोहित शेटे ,,विशाल अग्रवाल,निलेश अग्रवाल,सचिन जैन ,भालचंद्र वाघ ,नीलिमा ठाकूर,कविता बाविस्कर या उत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त- धुळे जिल्यातील शिरपूर शहरात कायमच आगळे वेगळे व भव्य कार्यक्रम समिती तर्फे होत असतात नुकतेच आयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त शिरपूर येथे महाराष्टात सर्वात भव्य रैली व यज्ञ झाला ज्याची नोंद आयोध्या संस्थांनी देखील घेतली.
याच धरतीवर शिरपूर येथील मांडळ शिवारातील भगवान महावीर उद्यान करवंद रोड शिरपूर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सुमारे दहा ते बारा लाख भाविक रोज कथा स्थानी येतील त्यांची योग्य सोय व्हायला हवी म्हणून पूर्ण शिरपूर सज्ज झालेले आहे. महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा मंडप व सर्वात मोठी जागा शिरपूरला असल्याचे भाविकांनी सांगितले सुमारे 60 एकर पेक्षा जास्त जागेत कथा ऐकण्यासाठी बसण्याची सोय केलेली आहे 20 पेक्षा जास्त स्क्रीन मंडपात लावण्यात येणार असून स्वयंपाकासाठी 15 एकर जागा वेगळी करण्यात आलेली आहे भाविकांना मुक्कामासाठी जवळच मंडप टाकून त्यांचे राहण्या खाण्याची सोय करण्यात आल्याचे आयोजकांनी कळवले
दहा हजार स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी नोंदणी समितीकडे केलेली आहे,35 समित्या स्थापन करून सेवेची विभागणी केली आहे. कथा स्थळा पासून २ किमी च्या अंतरात पार्किंग उपलब्ध असणार आहे.
प्रशासनाने मिटिंग घेऊन सर्व ते सहकार्य केले असून योग्य बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
शिरपूर येथे शिवमहापुराण कथेचा अभूतपूर्व उत्साह आहे
महाराष्ट्रात नाशिक,धुळे,जळगाव येथे पंडितजी मिश्रा यांची कथा भाविकांनी ऐकली कथेच्या पूर्वीची तयारी व सोहळे देखील पाहिले आहेत त्यांची तुलना केल्यास शिरपूरला भव्य कथा होणार असल्याचे बोलले जाते
शिरपूर ला २२ ऑक्टोबर रोजी सिहोर ला तारीख ठरली तारीख मिळताच शिरपूर ला फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त झाला.
२७ ऑक्टोबर ला कथेचे स्थान नक्की होऊन हजारो लोकांच्या उपस्थितीत सनातन पद्धतीने ध्वजारोहण व भूमिपूजन झाले.
२/११/२०२४ रोजी कथेच्या ठिकाणी दिवाळी व नूतन वर्षा निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यात कॉलेज च्या मुलांनी 2000 पणत्या लावून *श्री शिवाय नमस्तुभ्यं* तयार केले महिला वर्गाने सोबत शेकडो दिव्यांनी रोषणाई केली भाविकांमध्ये कथेचा उत्साह पाहून श्री शिवमहापुराण उत्सव समिनीतीने दि १५ नोहेंबर ला त्रिपुरारी पोर्णिमे निमित्त तुलसी दामोदर विवाह आयोजित केला
७१ तुळशी व १५० यजमानांच्या सह ६००० चे वर भाविकांनी लग्नाला हजेरी लावली त्यात ५ घोडेस्वार दामोदर रुपी शिव रुपी सवार झाले अगदी त्रिपुरासुर साकारण्यात आला नृत्य ही साकारले, ६००० च्या वर भाविकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.हे सर्व उत्साह वर्धक सोहळे कुठल्याही कथेच्या आधी कोठेही पहायला मिळाले नाहीत याची चर्चा शिरपूर ला मोठ्या प्रमाणात आहे.
पुढे येणाऱ्या दिवसात उत्सव समिती तर्फे राहुल फुलारी,संजय शर्मा ,राधेश्याम जांगीड यांनी तयार केलेली ३ लाख रुद्राक्षा पासून महादेवाची लिंग करून सोबत 31 फुटी त्रिशूल कथेत ठेवण्यात येणार आहे, सिद्ध रुद्राक्षा चे ८ डिसेंम्बर ला वाटप होणार असल्याचे सांगितले तसेच या पूर्वी दि २४ नोहेंबर रोजी सकाळी १० वाजता ३१००० रुद्राक्षा पासून बनवलेल्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महाप्रसाद भंडारा आयोजित केला होता.सिद्ध झालेले 31000 रुद्राक्षा चे वितरण भाविकांना करण्यात आले. आगामी दिवसात
शिवमहापुराण ग्रंथाची भव्य कलश यात्रा दि २९/११/२०२४ रोजी सकाळी ९-३० वाजता पाटील वाडा येथून निघेल कुंभारटेक मार्गे शहादा रोड ने कथा स्थळी आणून त्याची स्थापना स्टेज वर करण्यात येणार आहे.
महिला कलश डोक्यावर घेऊन त्यात घरात गंगाजल असेल,नर्मदेचे ,तापी चे जल असेल ते घेऊन कथा स्थळी असलेल्या 3 लाख रुद्राक्षा चे शिव पिंडीवर अर्पण करणार आहेत.
दि ३० रोजी दुपारी पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे आगमन होणार असून त्यांची शोभा यात्रा किसन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यालया पासून ते पाटील वाड्या पर्यंत काढण्यात येणार आहे सर्व शिरपूर करांनी कथेत सहभागी होण्याचे व कथा निर्विघ्न होवो अशी प्रार्थना करण्याचे आवाहन
श्री शिव महा पुराण उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.
कथेचे आयोजक माजी आमदार कै प्रल्हाद तात्या यांचा वारसा लाभलेले शिरपूर चे भावी नेतृत्व श्री हेमंत पाटील,भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक श्री मोहन पाटील ( मनू दादा पाटील ) यांनी प्रामुख्याने केले असून सर्व शिरपूरकर हे आयोजकच आहेत अशी भावना अग्रसेन भुवनातील मिटींगला व्यक्त करण्यात आली होती.
उत्सव समितीत शेकडो नावे असून त्यात प्रमुख प्रसाद पाटील,अँड.सुहास वैद्य,अनिल अग्रवाल,अँड.अमित जैन,शरद अग्रवाल, रोहित शेटे,नितीन धाकड,अशोक शर्मा, अमोल पाटील,शुभम पाटील यांनी सर्वांच्या साथीने सर्व नियोजन केले त्यांना श्री पद्माकर शिरसाठ व सर्व इंजिनियर काँट्रॅकटर यांची साथ लाभते आहे,तुलसीभाई यांची सर्व जमीन लेव्हल करण्याचे काम करणे सुरू केले आहे.तसेच विक्की चौधरी, गणेश चौधरी, टिलु पाटील, अंकित शेवाळे, राहुल राजपुत, भुरा पाटील,राधे चौधरी,हे महत्वाच्या समित्या सांभाळत आहेत
श्री शिव महापुराण उत्सव समिती शिरपूर ने या अभुतपुर्व कथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
