शिरपूर तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यामुळे शेत पिकांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान,पंचनामा करून नुकसान भरपाई ची शेतकऱ्यांची मागणी




शिरपूर तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यामुळे शेत पिकांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान,पंचनामा करून नुकसान भरपाई ची शेतकऱ्यांची मागणी 

शिरपूर (प्रतिनिधी) 
  शिरपूर तालुक्यातील पश्चिम भागात अंतुर्ली, जवखेडा, वरुळ,भटाने, लोंढेरे, व तराडी आदी परिसरात काल वादळी वाऱ्यास मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा काढणी ला आलेले पिक भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एका निवेदन द्वारे जिल्हाधिकारी धुळे,तहसीलदार शिरपूर, तालुका कृषी विभाग यांच्याकडे केली आहे.
    याबाबत थोडक्यात वृत्त असे की दिनांक ९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील पश्चिमपट्टा भागातील अंतुर्ली,जवखेडा, वरुळ,भटाने,लोंढेरे व तराडी आदी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढलेला आलेला मूग, कापूस,बाजरी,ज्वारी, उडीद, मका व केळी इतर पिके भुईसपाट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांनी बँका व खाजगी सावकारांकडून कर्ज काढून जेमतेम पेरणी केली होती. शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर रवींद्र भीमराव पाटील, लक्ष्मण आनंदा पाटील, महेंद्र राजेंद्र पाटील, उमेश शांताराम पाटील, शेखर शांताराम खंडेराव,गौतम दिलीप ठाकरे विनोद देविदास पाटील,राजकपूर पंडित पाटील,विलास मधुकर भामरे,कैलास यशवंत सोनवणे,रामकृष्ण आनंदा पाटील,गौतम दिलीप ठाकरे,महेश राजेंद्र पाटीलआदींच्या सह्या आहेत. शेतकऱ्याने निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी धुळे,तहसीलदार शिरपूर,तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर यांना दिले आहेत. 
या परिसरात रात्री डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी शेतकऱ्यांना भेट देऊन पाहणी केली. तसेच तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी देखील सकाळी परिसरात येऊन पाहणी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने