अखेर चार वासरांच्या फडशा पाडणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद* शहादा - प्रतिनिधी सुमित गिरासे




*अखेर चार वासरांच्या फडशा पाडणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद*  

शहादा - प्रतिनिधी सुमित गिरासे 

    चार वासरांचा फडशा पाडणारा बिबट्या अवघ्या 30 मिनिटात पिंजऱ्यात अडकला अन् शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र .... पुन्हा टेन्शन मध्ये आले.मोहिदा त.श. शिवारातील दोंडाईचा रोड लगत असलेल्या हॉटेल सूर्यवंशी च्या मागे काल दि.23 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे या परिसरातील शेत शिवारातील शेतकरी व शेतकरी मजुरांना दिलासा मिळालेला असतानाच  आज पुन्हा त्याच परिसरात अजून एक बिबट्या शेतकऱ्यांना दिसून आल्याने घबराट निर्माण झाली असून वन विभागावर नव्याने पिंजरे लावन्याची वेळ आली आहे


     शहादा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवारांमध्ये बिबट्या दिसून येत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे आठ दिवसापूर्वीच राणीपूर परिसरात बिबट्याने एका बारा वर्षीय मुलावर हल्ला करून त्यास ठार मारले होते त्यानंतरही अधून -मधून बिबट्याचे दर्शन होतच आहे मोहिदा तश व सावळदा परिसरात देखील महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे  बिबट्याचे वास्तव्य वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या परिसरात देखील रात्रीच्या वेळी कोणीही शेत शिवारांमध्ये जाण्यास धजावत आहे आहे पंधरा दिवसांपूर्वी सावळदा येथील विजयसिंह चंद्रसिंग पाटील या शेतकऱ्याचे मोहिदा त.श. शिवारातील शेतात गाईचे दोन वासरे व म्हशीचे एक पारडू आणि आठ दिवसापूर्वी सावळदा येथे शांतीलाल बाबूलाल गिरासे यांच्या शेतातील गाईचे वासरू अशा तीन वासरू व एका पारडूचा त्याने फडशा पाडला होता त्यानंतर काल दिनांक 23 रोजी देखील सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने हॉटेल सूर्यवंशी च्या मागे शेतांमध्ये सहा वाजता दोन कॅमेरे व पिंजरा लावला होता या पिंजऱ्यात असलेल्या बकरीच्या लालसेने अवघ्या 30 मिनिटात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असतानाच त्यांच्या या आनंदावर आज पुन्हा विरजण पडले कारण आज देखील या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागाने पुन्हा  पिंजरा लावला आहे मिळालेला माहितीनुसार पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर जातीचा असून आज पुन्हा दिसून आलेला बिबट्या मादी जातीचा असल्याचे समजते त्यामुळे या परिसरात बिबट्याचा परिवार  फिरत आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कही खुशी तर काही गम असाच प्रकार सदर परिसरात दिसून आला आहे
      सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे , वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे वनपाल संजय पवार अनिल तावडे रूपाली मोरे दिनेश वळवी योगेश पावरा नई मिर्झा ज्ञानेश्वर पवार संजय वाघ यांच्या पथकाने बिबट्याला रेस्क्यू करण्याचे ऑपरेशन राबविले वन्यजीव संरक्षक महेश तावडे बाबू मेमन स्वप्निल इंगळे सागर निकुंबे रहीम बेलदार याच्या पथकाने ही कामगिरी केली.
     
*आम्हाला एवढेच काम आहे का ?*
     सदर परिसरात शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण असताना बिबट्याला रेस्क्यू करण्याबाबत असलेल्या परिस्थितीबाबत विचारना करणाऱ्यांना वनसंरक्षक तेजस्विनी साळुंखे व नितीन पाटील तपासणी नाका शहादा यांनी  आम्हाला एवढेच कामे आहेत का असे सांगून नागरिकांना उर्मटपणे उत्तरे देऊन नागरिकांचा रोष ओढून घेण्याचा प्रकार केला त्यामुळे या बेजबाबदार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने