शिरपुर स्वच्छता अभियानात अजुन एक नविन सुत्य उपक्रमाची भर शिरपुर शहरातील युवा मित्र श्री.प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त शहरातील सर्व मंदिराना निर्माल्य संकलन पेटीचे भेट




शिरपुर स्वच्छता अभियानात अजुन एक नविन सुत्य उपक्रमाची भर

शिरपुर शहरातील युवा मित्र श्री.प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त शहरातील सर्व मंदिराना निर्माल्य संकलन पेटीचे भेट 

शिरपुर शहरातील युवा नेतृत्व व भा ज पा चे  जेष्ठ नेते, तथा नगरसेवक मा.श्री.मोहन हुलेसिंग पाटील यांचे चिंरजीव श्री.प्रसाद आबा पाटील यांच्या दि.८ऑक्टोंबर रोजी वाढदिवसा निमीत्ताने सामाजिक जानिवेचे भान ठेवत काल सकाळी ११ वा. शिरपुर शहरातील श्री.गणपती मंदिर , श्री.बालाजी मंदिर(खालचे गाव) श्री.सप्तश्रृंगी माता मंदिर,श्री.बालाजी मंदिर (वरचे गाव) श्री.खंडेराव मंदिर,शिरपुर शहारतील विविध १०८ मंदिरांत निर्माल्य पेटी भेट म्हणुन दिली.
शिरपुर शहरातील मंदिरांची पाहणी केली असता मंदिरातील देवाच्या मुर्ती वरील फुलहार,व भक्त्तांनी चढविलेल्या विविध वस्तु एका बाजुला ठेवतात. ते निर्माल्य अस्तावेस्त स्वरूपात न राहता निर्माल्य पेटीत टाकता याव ह्या उद्देशाने रायगड गृप मित्र परीवाराचा संक्ल्पने नुसार मंदिरांना निर्माल्य संकलन पेटी भेट म्हणुन देण्याचा विचार समोर आला.व आज प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त संकल्प पुर्ण केला. जेने करून निर्माल्य वस्तुचे पावित्र्य देखील राखल जाईल व मंदिर परीसरातील स्वच्छता देखील राखली जाईल.
या प्रसंगी नगरसेवक श्री.हेमंत पाटील, श्री.रोहीत शेटे, श्री.अमोल पाटील, श्री.मुकेश बाफणा, अरविंद बोरसे,गणेश चौधरी,विक्की चौधरी(अध्यक्ष- युवा मोर्चा),मगन पाटील, भुरा  पाटील ,राधे चौधरी,पप्पु राजपुत,विक्की पाटील, डाॅ.हितेश पाटील,जितु नाकम,अमन कटारीया(गव्ह.काॅ),शुभम पाटील, सोनु हजारे, राहुल राजपुत, हेमंत बोरसे, नवनाथ माळी, कवन राजपुत आदि सर्व मित्र परीवार उपस्थित होते.....

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने