प्रतिबंधित विमल गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर म्हसावद पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा, ता.२ : शहादा खेतिया रस्त्यावर खेडदिगर गावाजवळ म्हसावद पोलिसांनी तीन लाख २० हजार रुपयांच्या विमल गुटखा व सुगंधित पान मसाला व ८०हजार रुपये किमतीची अपे रिक्षा असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल म्हसावद पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार (ता. २)दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास खेडदिगर गावाजवळ जगमा स्कूल समोर (एम. एच.३९ सी. ९५०१)क्रमांकाची अपे रिक्षा जात असताना तिची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित तीन लाख २० हजार ९०रुपये किमतीचा विमल गुटखा व सुगंधित पान मसाला तसेच ८० हजार रुपये किमतीची ॲपे रिक्षा असा एकूण चार लाख ९० रुपयांच्या मुद्देमाल म्हसावद पोलिसांनी जप्त केला असून अन्नसुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जीवनलाल नामदेव निकम (वय ३०)रा. हनुमानचाळ, खेतीया ता. पानसेमल याच्या विरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाडवी, अजित गावित,मुकेश राठोड,राकेश पावरा, भरत बाविस्कर यांच्या पथकाने कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील हे करत आहे.
