शिरपूर विधानसभा निवडणुक, अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण




शिरपूर विधानसभा निवडणुक, अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण 

शिरपूर  - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या 1812 अधिकारी व कर्मचारी यांना मा जितेंद्र पापडकर,  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,  डॉ शरद मंडलिक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग तसेच महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रशिक्षण दिले. 

सदरचे प्रशिक्षण आर सी पटेल मेन बिल्डिंग राजगोपाल भंडारी सभागृहात आयोजित केले होते. प्रशिक्षण मध्ये साहित्य स्वीकृती व वितरण केंद्रावरून मतदान साहित्य स्विकारण्या पासून परत मतदान साहित्य जमा करण्यापर्यंत,मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या  च्या दिवशी करावयाच्या विविध टप्यावरील विषयांचे सखोल प्रशिक्षण ppt सादरीकरणद्वारे  देण्यात आले प्रशिक्षण मध्ये evm मशीन हाताळणी प्रशिक्षण मास्टर ट्रेनर मार्फत देण्यात आले.  प्रशिक्षण मध्ये विधानसभा निवडणूक  बाबत नव्याने समाविष्ट गोष्टी वर भर देण्यात आला. निवडणूक प्रशिक्षण साहित्य तसेच मतदान केंद्र अध्यक्ष माहिती पुस्तिका ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी क्युअर कोड ची व्यवस्था केली होती तसेच मॉक पोल कसे करायचे याचे प्रात्यक्षिक पडद्यावर दाखवण्यात आले मतदाणासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारीसाठी टपाली मतपत्रिका बाबतच्या सूचना देऊन संबंधीत कर्मचारी्याने अर्ज स्वकरण्याबात सोय करण्यात आली होती . मतदान अधिकारी कर्मचारी यांचे साठी मतदान केंद्रावरील मतदार यादीतील नाव, अनु क्रमांक ऑनलाईन पाहण्या साठी मतदार सहाय्यता कक्ष  ची स्थापना करण्यात आली होती. प्रशिक्षण वर्गास मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार विजय पाटील, रवींद्र कुमावत, महेश साळुंखे, निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या सह सॅक्टर अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणवेळेस गैरहजर कर्मचारी यांना लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने