शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक 28 रोजी सहा उमेदवारांनी भरले 10 अर्ज
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी दिनांक 29 ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. मात्र त्याआधी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी शुभ मुहूर्त सात तालुक्यातील सहा उमेदवारांनी आपले दहा नामांकन अर्ज प्रशासनाकडे दाखल केले आहेत.
यात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान पावरा यांनी चार अर्ज भरले असून अपक्ष उमेदवार दीपक मधुकर शिरसाट यांनी एक अर्ज भरला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे उमेदवार बुधा मला पावरा यांनी एक अर्ज भरला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सतीलाल रतन पावरा यांनी देखील एक अर्ज भरला, डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर गीतांजली शशिकांत कोळी यांनी देखील एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शेवटच्या दिवशी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून देखील शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
यानंतर दिनांक चार रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर तालुक्यातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.



