महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024* *जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे* *जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रकाशन*




*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024*
*जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे*
*जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रकाशन*

*माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल*
  धुळे, दिनांक 28 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून निवडणूक हे एक टीम वर्क आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांचाही सहभाग महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. विधानसभा निवडणूक निष्पक्षरित्या पार पाडण्यात माध्यमांची भूमिका मोलाची आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पारंपारिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत निवडणूकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल.  
जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये 1978 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, मतदारसंघाचे नकाशे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, विधानसभा मतदार संघाचे सन 2024 चे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, एकूण मतदार, मतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे.
या पूर्वपीठिकेच्या निर्मितीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक डॉ किरण मोघे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पूर्वपीठिकेतील माहिती संकलन व संपादनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील उपसंपादक संदीप गावित, वरिष्ठ लिपिक बंडू चौरे, लिपिक चैतन्य मोरे, इस्माईल मणियार, समाधान शिंदे, ऋषीकेश येवले यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने