महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 धुळे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 39 व्यक्तींनी घेतले 67 नामनिर्देशन पत्र



महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
धुळे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 39 व्यक्तींनी घेतले 67 नामनिर्देशन पत्र
 
धुळे, दिनांक 24 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 39 व्यक्तींनी 67 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
  विधानसभा मतदार संघ निवडणूक-2024 ची अधिसूचना 22 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी 05- साक्री विधानसभा मतदार संघासाठी 12 व्यक्तींनी 20 अर्ज, 06-धुळे ग्रामीण 8 व्यक्तींनी 9 अर्ज, 07-धुळे शहर 7 व्यक्तींनी 16 अर्ज, 08-शिंदखेडा 6 व्यक्तींनी 10 अर्ज तर 09-शिरपूर मतदार संघासाठी 6 व्यक्तींनी 12 अर्ज असे एकूण पाच विधानसभा मतदार संघासाठी 39 व्यक्तींनी 67 अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.
000000

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने