विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी EVM व VVPAT संदर्भात शिरपूर तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहिम

 



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी EVM व VVPAT संदर्भात शिरपूर तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहिम 

शिरपूर प्रतिनिधी - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी EVM व VVPAT संदर्भात शिरपूर तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहिम शिरपूर तालूक्यात दिनांक ११-०९-२०२४ ते १८-०९- २०२४ पर्यंत राबविण्यात येत असून शिरपूर तालुक्यातील सर्व मतदारांना जाहीर आव्हान करण्यात आले आहे.



०९-शिरपूर (अ.ज) विधानसभा मतदार संघातील सर्व जागृत मतदार बंधु बघिणी यांना आव्हान  करण्यात आले आहे की,मा. भारत निवडणूक आयोग यांचा आदेशानुसार व मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धुळे यांचेकडील दि.०६/०९/२०२४ रोजीचे पत्रान्वये आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी EVM व VVPAT संदर्भात जनजागृती मोहिम शिरपूर तालूक्यात दिनांक ११-०९-२०२४ ते १८-०९-२०२४ पर्यंत राबविण्या बाबत आदेशित केलेले आहे. या कालावधीत EVM व VVPAT प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी,  क्षेत्रात (गावातील मतदान केंद्र, वाडे, पाडे, चौक, नाका, बाजार, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस स्टेशन, बस स्टॅन मोक्याची ठिकाणी, सभांची ठिकाणे, गाव चावडी इ.) मोबाईल व्हॅन घेऊन EVM व VVPAT मशीनची प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरात या मोबाईल व्हॅन जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे. याबाबत प्रात्याक्षिक दाखवून प्रत्येक्षात मतदान करून घेण्यात येणार आहे व मतदारांना VVPAT मशिनव्दारे ज्या उमेदवारास मतदान केले याबाबत VVPAT व्दारे त्याच उमेदवाराचे चिन्हास मतदान केल्याची पावती मतदारास दिसणार आहे व मतदान योग्य उमेदवारास देण्याची खात्री होणार आहे. तरी सर्व मतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आवाहनम. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर श्री. डॉ शरद मंडलीक व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार शिरपूर यांनी केले आहे.



EVM व WPAT या व्दारे तहसिल कार्यालय शिरपूर येथे कार्यालयात स्वतंत्र मतदान कक्ष स्थापन केलेले आहे. तरी सर्वानी या मोहिमेचा लाभ घ्यावा व प्रत्यक्ष मतदान करून खात्री करून घ्यावी अशी विनंती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार शिरपूर यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने