भडणे येथे पोळा सण उत्साहात साजरा,
सर्जा राजाची उत्कृष्ट सजावट केलेल्या मालकांची भडणे पोलीस पाटलांनी केला सन्मान
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे पोळा सण अतिशय उत्साहात शांततेत व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला भारत हा कृषिप्रधान देश असून ही ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांरी राजाचा कष्टकरी साथीदार म्हणजे ,बैल स्वाभिमान अभिमान आणि भरोश्या या गुणांमुळे शेती प्रधान भागाला सर्वांना आवडणारा बैलपोळा सण बैलाच्या कष्टाची व त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शेतीपूरक,महाराष्ट्रात पोळा सण शेतकरी वर्ग अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला काळया मातीत वर्षभर काम करणाऱ्या सर्जा राजा मशागतीतुन आपल्या मालकाला भरघोस उत्पन्न मिळवून देतो त्याच्या कामाच्या कृतज्ञता साठी पोळाच्या दिवशी शेतकरी सकाळी शेतात किंवा नदीवर बैलांची आपल्या सर्जा राजाची स्वच्छ पाण्याने अंघोळ करून त्याला आपल्या घरातील सदस्य प्रमाणे दिवसभर कुठलेही काम न लावता संपूर्ण दिवसभर पोटभर चारा देऊन दुपारी बाजारातून बैलांसाठी नवीन दोर नाथ शिर मोरखी घुंगरू घाटी तसेच उत्कृष्ट सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारातून विकत घेऊन त्यांच्या सिंगांना शामी बसवुन रंगांनि उत्कृष्ट पद्धतीने सजवून आपली जोडी कशी उत्कृष्ट सजावट करता येईल यासाठी सर्जा राजाची उत्कृष्टपणे सजावट करून घेतली होती यासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब आपल्या मुलांना पोळ्याच्या दिवशी घरी आणून परिवारासह पोळा उत्साहात सहभाग घेतात गावात दोन वाजेपासून पोळा उत्सव वाला सुरुवात करण्यात आली गावातील ग्रामदैवत मारुती मंदिरापासून ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणुकी द्वारे गावातून बैलजोडींना फिरविण्यात आले व प्रत्येक शेतकरी वर्गाने आपल्या घरी बैल जोडीला घेऊन गोड पुरणपोळी चा नैवेद्य देऊन महीलानी त्याची पूजा विधी करून घरमालक आपला सर्जा राजासाठी उपास सोडतात त्याला परत आपल्या गोठ्यामध्ये घेऊन हिरवं वैरण पोट भरून टाकतात पवित्र असा सणाला शेतकरी वर्ग प्रेमाने सर्जा राजाची काळजी घेऊन पोळा साजरा उत्साहात करण्यात आला यावेळी पोलीस पाटील युवराज माळी यांनी बैलांची आपल्या राहत्या घरी ऑक्षन करण्यात आले गावकरी व शेतकरी बंधूंनी आपल्या सजा राजाच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नैवेद्य दाखवून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला
पोळा उत्साह दरम्यान गावात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही शांतता प्रिय उत्सव साजरा करून गावकऱ्यांनी भडणे गाव शांतता प्रिय व एकतेचे प्रतीक असल्याचे गावकऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले यावेळी गावात उत्कृष्ट सजावट केलेली भडणे येथील विनोद सम्राट खानदेश भूषण ह भ प नारायण महाराज यांच्या सर्जा राजा यांची जोडीने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल उत्कृष्ट सजावट केल्याबदल यांचे चिरंजीव योगेश राजपूत जितेंद्र राजपूत यांना सर्जा राजा बैल जोडी मालकाचा भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी शाल श्रीफळ टोपी रुमाल देऊन त्यांचा परिवाराचा गौरव पूर्वक सन्मान केला यावेळी योगेश बागुल भूपेश निकम बाबा मंगळे आदी यावेळी उपस्थित होते
युवराज माळी पोलीस पाटील भडणे,,,,,,,
Tags
news
