महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या कंटेनर वर तालुका पोलिसांची कारवाई



महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या कंटेनर वर तालुका पोलिसांची कारवाई 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतूक करणाऱ्या कंटेनर वर कारवाई करत मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सेंधवाकडुन शिरपुरकडे महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत असलेली तंबाखुजन्य पदार्थाची कंटेनर क्र. MH-14, LB- 6149 मध्ये भरुन वाहतुक होत आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन त्यांनी आपले एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले होते.
 त्यावरुन सदर पथकाने रात्री 03.30 वाजेच्या सुमारास हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे टाटा कंटेनर क्र. MH-14, LB-6149 हिस थांबवुन कंटेनरवरील चालकाच नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेशकुमार पिता ताराचंद व. 23 वर्षे व्यवसाय- ड्रायव्हर रा. बकारीयावाली पोय गुडीया खेडा ता.जि. सिरसा राज्य-हरियाणा असे सांगितले. त्यास कंटेनर मध्ये काय भरले आहे बाबत विचारणा केली असता, त्याने सांगितले की, कंटेनर मध्ये ट्रान्सपोर्टचा माल भरलेला असुन सदरचा माल हा पुणे येथे घेवुन जात आहे. परंतु सदर वाहनात प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा माल असण्याची दाट शक्यता असल्याने सदरचे वाहन हे पोलीस ठाणे आवारात लावुन दिवसा पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली तंबाखुजन्य पदार्थाचा माल मिळुन आला. त्यात

1. ८२,८००/- रु. किमतीची सुगंधीत तंबाखु २३ कागदी खोके असून प्रत्येकी खोक्यात ५ किग्र वजनाचे ४HDPE पिवळ्या रंगाचे बॅग

2. १०,००,०००/- रु. किमतीचे वाहन टाटा कंटेनर क्र. MH-१४, LB-६१४९ जु.वा.कि.अं.

एकुण 10,82,800/- रु. किंमत च्या मुद्द्यामाल मिळून आला.

मा. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, धुळे (म.रा.) यांना सदर मालाची तपासणी करुन कारवाई होणेबाबतचे पत्र देण्यात आले. त्यावरुन अन्न सुरक्ष अधिकारी शरद पवार यांनी मालाची तपासणी केली असता, सदरचा माल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असल्याचे निरीक्षण नोंदविल्याने त्यांनी नमुद वाहन चालकाविरुध्द सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद दिल्याने शिरपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 241/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,223,274,275 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (iv), 27(3) (d), 27(3) (e), 30(2) (a), उल्लधन कलम 59 (i) अन्वये दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्याचा मुख्य सुत्रधाराचा शोध घेणेकामी पोसई/सुनिल वसावे, पोहेका / संदिप ठाकरे, पोहेकॉ/ राजु ढिसले, पोकॉ/ योगेश मोरे, पोकॉ/ संजय भोई अशांचे पथक तयार करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो, अपर पोलिस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, पोहेकॉ / सागर ठाकुर, पोहेकॉ /संदिप ठाकरे, पोहेकॉ/राजु ढिसले, पोना/मोहन पाटील, चपोकॉ/ मनोज पाटील, पोकॉ/ योगेश मोरे, पोकों/ संजय भोई, पोकॉ/ सुनिल पवार यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने