शिंदखेडा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांची आमदार जयकुमार रावल यांना मागण्यांबाबत निवेदन देऊन चर्चा
शिंदखेडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी यांनी शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांना आपल्या मागण्या बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील ग्राम पंचायत कर्मचारी लिपिक शिपाई पाणीपुरवठा कर्मचारी सफाई कर्मचारी शासन निर्णय आदेश व परिपत्रकाची शंभर टक्के अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर होत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत अत्यल्प मानधनावर काम करणारे कर्मचारी यांना नियमित मानधन वेळेवर मिळत नाही तसेच राहणीमान भत्ता पीएफची रक्कम अदा करण्यात यावी ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा काढण्यात यावा तसेच रात्री गावात पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅटरी शूज सायकल इलेक्ट्रिक साहित्य हेल्मेट देण्यात यावे तसेच कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्यापक करून देण्यात यावी याबाबत स्थानिक पातळीवर गट विकास अधिकारी यांना मागण्याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष महेश कोळी यांनी केली यावेळी आमदार जयकुमार भाऊ रावल
यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समस्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या समस्या आपण ग्रामविकास मंत्री यांच्यासमोर बैठक घेऊन महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असा आशावाद यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे शिषटडळास दिला सोडवण्याचे आश्वासन दिले
