होळनांथे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन मेळावा संपन्न




होळनांथे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन मेळावा संपन्न

होळनांथे - शिरपूर -
श्री. रामेश्र्वर रामरतन खंडेलवाल विद्यालय होळनांथे येथिल  1996 चे 10 वी बॅच चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचा 28 वर्षा  नंतर स्नेहसंमेलन (गेट टू गेदर)  कार्यक्रम  हा सर्वांचे श्रद्धा स्थान असलेले सुप्रसिद्ध महादेव मंदिर नागेश्वर   ता. शिरपूर जि. धुळे या ठिकाणी संपन्न झाला.



श्री. रामेश्र्वर रामरतन खंडेलवाल विद्यालय होळनांथे येथिल  1996 चे इयत्ता 10वी बॅच चे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी  यांचा सुप्रसिध्द महादेव मंदिराचे परिसरातील हिरवगार पर्वत रांगा सुंदर निसर्ग रम्य वातारणात  1 सप्टेंबर  2024   रविवार  रोजी  गेट टू गेदर कार्यक्रम ला शिक्षकांचे हस्ते सरस्वती मातेचे पूजन करुन कै.श्री.एल.आर.बाविस्कर सर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली नंतर शिक्षकांचे आणि जिवलग वर्गमित्र आणि मैत्रिणीनी आपले मनोगत व्यक्त केले , सर्व भावांचा हातावर बहिणींनी  राखी बांधून एकमेकाचे जिव्हाळ्याचे संबंध अधिक घट्ट करून रक्षाबंधन साजरा केले, काही मित्र आणि मैत्रिणींनी दोस्ती चां नावावर अतिशय सुंदर गीत सादर केले, काही गाण्यावर नृत्य सादर केले , संगीत खुर्ची चे गेम खेळून मनोरंजन केले आणि अतीथी चा वाढदिवस  साजरा केला. कार्यक्रमाला आदर्श शिक्षकांचे उपस्थितीत व जिवलग वर्गमित्र आणि मैत्रिणी हे मोठ्या संख्येने उपस्थिती राहुन अतिशय उत्साहात हा मेळावा  साजरा करण्यात आला .

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोस्ती ग्रुपचे जिवलग वर्गमित्र आणि मैत्रिणी  पंकज भाऊ सिसोदिया , मिथुन भाऊ खिलोसिया  , रविंद्र भाऊ धनगर , किशोर मराठे , रमेश भाऊ चव्हाण, तन्वीर भाऊ खाटीक , योगेश पवार ,कलीम भाऊ शेख मुसलमान , जितेंद्र भाऊ जाधव , राजेन्द्र भाऊ धनगर सीमा ताई धनगर, आशा ताई महाले, शोभा ताई राजपूत, योगिता ताई राजुप्त, उषा ताई पवार, सुरेखा ताई पाटील,दिपश्री ताई पवार.. यांनी  गेट टू गेदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

एकमेकांचे निरोप घेत आयुष्याच्या पुढील वळणावर पुन्हा एकदा भेटण्याचे वचन देत कार्यक्रम संपन्न झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने