एचपीटी आरवायके महाविद्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे




एचपीटी आरवायके महाविद्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 

शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे 

एचपीटी आरवायके महाविद्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली*.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते महाविद्यालयात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. चौरसिया उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एन सूर्यवंशी याप्रसंगी म्हणाले सर्वप्रथम मी श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येक नागरिकाला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. श्री गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. गणेशोत्सव भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. श्री गणेश चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी, वृद्धी समृद्धी, सौभाग्याची देवता सुखकर्ता, विघ्नहर्ता 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असे मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करावयाची असेल तर गणेशाच्या पूजनानेच होते. तसेच भक्तांची सर्व विघ्नही ते दूर करतात त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता ही म्हणतात .गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी युवराज राजपूत ,हेमंत भावसार ,विष्णू काटे, नितीन शिंगणे ,अमर फुलावळे, श्रीकांत पिंगळे यांनी सहकार्य केले.
तमाम जनतेस महाविद्यालयाच्या वतीने श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने