दोन शिक्षक आणि एका खाजगी इसमावर नंदुरबार एसीबी ची कारवाई
नंदुरबार प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्यातील दोन शिक्षक आणि एका खाजगी इसमावर नंदुरबार एसीबी ची कारवाई केली आहे. सरकारी काम करून देण्यासाठी लाच घेण्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपी लोकसेवक 1) श्री. नरेंद्र राजेंद्र इंद्रजीत , वय 40 वर्षे, पद - माध्यमिक शिक्षक नेमणूक - स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय , मोलगी ता. अक्कलकुवा जिल्हा- नंदुरबार. रा. पंचायत समिती शासकीय वसाहत , अक्कलकुवा.
2) रोशन भीमराव पाटील , वय 40 वर्ष , पद - प्राथमिक शिक्षक नेमणूक - आदर्श प्राथमिक विद्यामंदिर अक्कलकुवा जिल्हा- नंदुरबार. रा. जगतापवाडी , नंदुरबार.
3) आरोपी खाजगी ईसम अरुण भगवान पाटील , वय- 51 वर्ष , व्यवसाय - शेती रा. तामसवाडी ता.जि.धुळे. यांचा समावेश आहे.यांनी तक्रारदार यांच्याकडून एकुण 1,10, 000/- रु. लाच रकमेची मागणी करून, यापैकी सुरुवातीस टोकन रक्कम 20,000/- रुपये लाचेच्या रकमेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. आणि रक्कम रुपये 20,000 स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत अधिकृत असे की तक्रारदार यांची पत्नी शिक्षीका असुन त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत नसल्याने त्यांचा पगार बंद झाला होता. तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव शालार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करून देण्यासाठी यातील आलोसे क्र. 1 व 2 यांनी आरोपी क्र.3 खाजगी इसम यांची शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथील अधिकाऱ्यांशी ओळख आहे , ते तुमचे काम करून देतील, असे तक्रारदार यास सांगीतले. तसेच तुमचे काम करायचे असेल तर तुम्हाला त्यांना एकुण 1,10,000/- रुपये द्यावे लागतील व त्यापैकी सुरुवातीला 20,000/- रुपये टोकन रक्कम द्यावी लागेल असे म्हणून तक्रारदार यांच्याकडुन लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार हे आरोपी क्रमांक 3 ( आरोपी खाजगी ईसम ) यांस भेटले असता त्यांनी पण आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्याप्रमाणेच तक्रारदार यांच्याकडुन लाचेच्या रकमेची मागणी करून , सदर लाच रक्कम आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्याकडे देण्यास सांगीतले.
तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणी ची पडताळणी कारवाई केली असता आरोपी क्र. 1 व 2 यांनी तक्रारीप्रमाणेच तक्रारदार यांच्याकडुन लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या बाबत आज दिनांक 29/9/2024 रोजी पंचांसमक्ष केलेल्या यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आहे. तसेच आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी आरोपी क्रमांक 1 यास तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करण्यास व मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून , या बाबत उपनगर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई **मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक ,मा .श्री माधव रेड्डी* अपर पोलिस अधीक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. ,*श्री स्वप्निल राजपूत*वाचक, पोलीस निरिक्षक, ला.प्र.वि. नाशिक.श्री राकेश चौधरी*पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि,नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र खैरनार , पोलीस निरीक्षक , लाप्रवि नंदुरबार ,
पोहवा/ विजय ठाकरे , पोहवा/ देवराम गावित, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/ संदीप खंडारे, पोहवा/हेमंत महालेसर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार. कार्यवाही मदत पथक पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सुर्यवंशी , पोहवा/ विलास पाटील , पोना/ सुभाष पावरा, पोना/ जितेंद्र महाले , सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यांच्या पथकाने केली आहे.
