मनोहर महाजन यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित



मनोहर महाजन यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित


एरंडोल तालुक्यातील मालखेडे उंमरेया ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मनोहर  भिकणराव महाजन यांना नुकताच  जळगाव जिल्हा परिषद मार्फत आदर्श   ग्रामसेवक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 
मनोहर महाजन यांची विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे
 ग्रामसेवक  आदर्श पुरस्कार मिळाल्याने  मनोहर महाजन यांना स्थानिक लोकप्रतिनिधीना गावातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन गावाच्या विकासाचे ध्येय घेऊन विविध विकास कामे उत्कृष्टपणे केली त्यात राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत गावाला पारितोषिक मिळून दिले तसेच गावात भूमिगत गटारे केल्यामुळे गाव डास मुक्त केले कोरोना काळात स्वच्छता आरोग्य लसीकरणावर भर देत आरोग्याची कामे केली तसेच गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा डीजीटल करणे करणे अंगणवाडी तुझे भी करना कुपोषण मुक्ती जल जीवन मिशन घरकुल योजना रोजगार हमी योजनेतून विविध कामे यासारख्या विविध योजना गावात राबवून  ऑफिस मधील कामाचे रेकॉर्ड व्यवहार पारदर्शक व सेवेतील नियमितपणा तसेच गावातील विविध विकास कामांसाठी मालखेडे व उंमरे ग्रामपंचायत पदाधिकारी यांना सोबत घेऊन गावात केलेली विकासात्मक कामे अशा विविध उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सण 2019 20 या वर्षात एरंडोल तालुक्यातील पुरस्कारासाठी निवड झाल्याने अभिनंदन करण्यात येत आहे गेल्या पाच वर्षापासून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विविध कारणांमुळे प्रलंबित होते मात्र नुकत्याच जिल्हा परिषदेने पुरस्काराची घोषणा केली 22 सप्टेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रधान सभागृहात या पुरस्काराचे वितरण माननीय नामदार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन माननीय नामदार अनिल पाटील मदत व पुनर्वसन म्हणजे माननीय नामदार गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा मंत्री खासदार ताईसो स्मिता वाघ जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  श्री आयुष प्रसाद जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित व व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजीव निकम यांच्या प्रमुख उपस्थित मनोहर भिकनराव महाजन यांना प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मनोहर भिकन महाजन यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सहकुटुंबासोबत सन्मानित करण्यात आल्यामुळे मालखेडे व उंबरे गावाचे गावकरी व पदाधिकारी यांनी आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत मार्फत ढोल ताशे वाजंत्री फटाकड्याची आतिषबाजी करून ग्रामपंचायत कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले  
....................................
प्रतिक्रिया...
आदर्श पुरस्काराचे  मानकरी माझे गावकरी 
आज  मला माझ्या कामाची पावती व माझे गावकरी मालखेडे उंमरे गावातील सर्वच राजकीय सामाजिक सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांच्या सहकार्य  त्यांच्यामुळे गावातील विधायक विकास कामे व गावातील सोडविलेल्या समस्या  व माझ्या कामातील पारदर्शकता तसेच पंचायत समिती  बिडीओ व कर्मचारी यांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच मला जिल्ह्याच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने  सन्मानित केल्यामुळे.खरे मालखेडे उंमरे श्रेय माझे  गावकऱ्यांना देतो
मनोहर भिकन महाजन आदर्श ग्रामसेवक मालखेडे उंमरे,,,,,,,,,,,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने