प्रकाशसिंहजी सिसोदिया यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रकोष्ट पदी दुसऱ्यांदा स्तुत्य निवड तर सहकार भारतीचा प्रदेश उपाध्यक्ष दिलीप लोहार यांची निवड




प्रकाशसिंहजी सिसोदिया यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रकोष्ट पदी दुसऱ्यांदा स्तुत्य निवड 
तर सहकार भारतीचा प्रदेश उपाध्यक्ष दिलीप लोहार यांची निवड

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्याचे आदर्श ग्रामसेवक म्हणून ख्याती प्राप्त आणि सध्या होळनांथे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री प्रकाश सिंह सिसोदिया यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रकाश पदी दुसऱ्यांदा स्तुत्य निवड झाली आहे. यापूर्वी देखील त्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पडली आहे. तर शिरपूर येथील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व दिलीप लोहार यांची देखील सहकार भारतीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.



सहकार क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सिसोदिया यांनी नेत्र दीपक असे काम केले आहे. सहकार क्षेत्राच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रम यांच्यावर सिसोदिया यांची उत्तम पकड आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र वाढवण्यात त्यांची मोलाची भूमिका नेहमीच असते. आणि त्यास मदत मिळते ती आप्पासाहेब दिलीप लोहार यांची.

सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य संघ परिवाराचा विचाराची संघटना देशात व महाराष्ट्रातील सर्व जिल्हास्तरावर कार्यरत आहे.
शिर्डी येथील १४ व्या त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेशाची आगामी तीन वर्षांसाठी राष्ट्रीय संघटन प्रमुख संजयजी पाचपोर, यांचे उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणुन मुंबई येथील अपना सहकारी बँक चे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांची तर दिलीप लोहार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली प्रदेश स्तरावरील विका सोसायटीचे प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशसिंग सिसोदिया यांची निवड करण्यात आली संपूर्ण कार्यकारिणीत विवेक जुगादे नागपूर यांची महासचिव,संघटन प्रमुख म्हणून नाशिक चे शरद जाधव, महाराष्ट्र सहकारी बँक फेडरेशन चे अध्यक्ष अजय ब्रम्हाचे नाशिक यांचीही उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीशजी मराठे रिझर्व्ह बँक चे संचालक, राष्ट्रीय महासचिव उदयजी जोशी एन.सी.डी.सी नवी दिल्ली चे संचालक आहेत सहकार क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण संघटनेत शिरपूर चे दिलीप लोहार व प्रकाशसिंग सिसोदिया यांची निवड अभिनंदनीय असून त्यातून शिरपूर  तालुक्याचा मान देखील वाढला आहे.

त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल तालुका भरातून राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने