शिरपूर तालुक्यातील गांजा शेती व तालुका पोलिसांची कारवाई, मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत
शिरपूर प्रतिनिधी -
शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन यांनी पुन्हा एकदा गांजा शेतीवर कारवाई करत मुद्देमालासह चार आरोपी यांना अटक केली आहे
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सो. यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाणे हद्दीत यापुर्वी गांजा लागवडी बाबत दाखल गुन्हयांच्या अनुषगांने अशा प्रतिबंधीत अंमली पदार्थाची लागवड होणार नाही. यासाठी परिसरात जनजागृती करण्याच्या तसेच गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड करणांऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषगांने पोनि जयपाल हिरे यांना दिनांक 25/09/2024 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, लाकड्या हनुमान गावाचे शिवारात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गांजा सदृश्य अंमली झाडांची वनजमिनीत लागवड केलेली आहे. सदर बातमी प्रमाणे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन गांजा लागवड केलेल्या शेतीचा शोध घेतला असता त्या भागातील एकमेकास लागुन असलेल्या 3 वेगवेगळया क्षेत्रांमध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केलेली दिसली. सदर ठिकाणी गेल्यावर काही ईसम पोलीस आल्याचे पाहून शेतात बांधलेल्या एका झोपडी सारख्या घरातुन बाहेर निघुन पळु लागले. सोबतच्या पोलीस पथकातील अंमलदारांनी यातील 4 ईसमांचा पाठलाग करुन पकडले. पकडलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1) सुरज कालुसिंग पावरा 2) रोषलाल हजाऱ्या पावरा 3) रोहित सुभाराम पावरा 4) समर बळीराम पावरा सर्व रा.रोहिणी ता.शिरपुर जि.धुळे असे असल्याचे सांगितले. तसेच ईतर 3 ईसम झाडाझुडपांचा फायदा घेवुन तेथून पळुन गेले असुन त्यांची नांवे 5) रणजित रामसिंग पावरा 6) युवराज मांगीलाल पावरा 7) भिमसिंग ऊर्फ भिमा बन्सीलाल पावरा याप्रमाणे निष्पन्न करण्यात आले आहेत, त्यानंतर सदर शेती अतिदुर्गम भागात असल्याने लागवड केलेल्या गांजा शेतीचे ड्रोन कैमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे. सदर गांजाच्या झाडांचे मजुराच्या साहाय्याने मुळासकट उपटुन मोजमाप केले असता ते खालील प्रमाणे,
34,80,000/- रुपये किंमतीचे 1740 किलो वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे हिरवे, ओले, ताजे झाड, पाने, फुले व फांद्या असलेले मुळासह 3 ते 5 फुट उंचीचे झाडे. प्रती किलो 2000/- रुपये प्रमाणे किंमत अंदाजे.
सदर गांजा सदृश्य वनस्पतीची झाडे जप्ती पंचनामा करुन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत. त्याबाबत पोहे को. चत्तरसिंग खसावद यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने गुरनं. 246/2024
एन.डी.पी.एस.कायदा कलम 20 व 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोउपोनि सुनिल वसावे करीत असुन 07 आरोपींपैकी 04 आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना 02 दिवासाची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
अशा प्रकारच्या गांजा वनस्पतीची लागवड, साठा, वाहतुक, विक्री करणे गंभीर गुन्हा असुन कोणीही असे कृत्य करु नये याबाबत पोलीस विभागाकडुन या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर श्री. भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल बसावे, पोसई मिलींद पवार, पोहेकाँ चत्तरसिंग खसावद, पोहेकाँ सागर ठाकुर, पोहेकॉ/ जाकीरोद्दीन शेख, पोहेकाँ/ रमेश माळी, पोहेकाँ/ संजय चव्हाण, पोहेकाँ/राजु ढिसले, पोना/ सुरेश पावरा, पोना/ मोहन पाटील, पोकौ/ प्रकाश भिल, पोको रोहिदास पावरा, पोको /ग्यानसिंग पावरा, पोकौं धनराज गोपाळ, चापोकौं / सागर कासार यांनी केली आहे.
