सर्व शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन साजरा करण्यात यावा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी



सर्व शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन साजरा करण्यात यावा

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी

 माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.

 आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सष्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक :२० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.

 

          सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजूषा,,चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी.

 

माहीती अधिकार दिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा या सठी माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, नाशिक महानगर पालिका उपायुक्त श्री. साताळकर, मुख्यमंत्री सचिवालयाचे तसेच निवासी जिल्हाधिकारी श्री, राजेंद्र वाघ, या सह नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आलेली आहे. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष दराडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते, संपर्क प्रमुख बाळासाहेब सहाणे, प्रचार प्रमुख रवी राखेचा, कार्यकारी प्रचार प्रमुख हरिकिसन आव्हाड, प्रचार प्रमुख किरण धुमाळ, जालीधर मराठे, गणेश मराठे, मनोहर भागरे, सुभम चौधरी, सोमनाथ वनार, विशाल एकडे, बाळासाहेब साखला, जे.के. मानवडे, या सह मोठ्या संखेने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

फोटो कॅप्शन –




१)      २८ सप्टेंबर हा शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा या साठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी.

 



२)      २८ सप्टेंबर हा शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा या साठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी.

 


 

३)      २८ सप्टेंबर हा शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा या साठी महानगर पालिकेचे उपायुक्त साताळकर यांना निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी.

 



४)      २८ सप्टेंबर हा शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा या साठी मुख्यमंत्री सचिवालय निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने