राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाची शिरपूर येथे शिव स्वराज्य यात्रा शिरपूर ,विधानसभा उमेदवारीवर नेते काय बोलणार याकडे तालुक्यांचे लक्ष




राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाची शिरपूर येथे शिव स्वराज्य यात्रा

शिरपूर ,विधानसभा उमेदवारीवर  नेते काय बोलणार याकडे  तालुक्यांचे लक्ष 

शिरपूर प्रतिनिधी - राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र विजयाच्या अशा असलेल्या जागेवर प्रत्येक पक्ष आपली राजकीय फिल्डिंग लावत आहे. येत्या विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने देखील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि शिरपूर या दोन मतदारसंघांवर आपले लक्ष केंद्रित केले असून पक्ष या दोन्ही मतदारसंघांवर आपले दावेदारी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
त्याच्याच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा.शरद पवार साहेब हे  दिनांक 15 सप्टेंबर रोजी  तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन त्यांनी या ठिकाणी ते मोठा भव्य शेतकरी मेळावा घेतला. 

आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिवस्वराज्य यात्रा ही शिरपूर शहरात येत आहे. शिरपूर तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी करण्यासाठी आरोग्य दुत डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे देखील इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. याबाबत पक्षाने त्यांना तयारी करण्याची पूर्व सूचना दिली होती. त्यानुसार मागील काही दिवसांपासून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी तालुक्यातील मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे. मात्र शिरपूर मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटणार की राष्ट्रवादीला हा तिढा अद्याप सुटलेला नाही. सदरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी कार्यकर्त्यांची आणि तालुक्यातील जनतेची इच्छा आहे. मतदारसंघात डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयाची अपेक्षा व्यक्त होत आहे. मागच्या निवडणुकीत अपक्ष असताना देखील डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी तालुक्यातील भरघोस मत मिळून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास आणि महाविकास आघाडीचे साथ प्राप्त झाल्यास, राज्यातील भाजप आणि महायुती पक्षांवरील नाराजी, शिरपूर तालुक्यातील बदलते राजकीय समीकरण, भाजपमधील अंतर्गत नाराजी, आणि राजकीय हुकूमशाहीला कंटाळलेली तालुक्यातील जनता ही परिवर्तनासाठी सज्ज आहे. त्यामुळे या निवडणुकीत योग्य उमेदवारास उमेदवारी प्राप्त झाल्यास निवडणूक चुरशीची होईल असे मानले जात आहे. 

त्यामुळे शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक दिग्गज नेते शिरपूर शहरात येऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. या दरम्यान शिरपूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनीती काय आणि संभावित उमेदवार कोण याबाबत नेते काय बोलतात याकडे शिरपूर तालुक्याचे लक्ष लागून आहे.
 
या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश आणि आदेश प्राप्त झाल्यास या  तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांना नवसंजीवनी प्राप्त होऊन ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा संभावित उमेदवाराकडून व्यक्त होत आहे.
आणि त्यामुळे उद्याच्या या मेळाव्याकडे शिरपूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. 

उद्याच्या जाहीर सभेतून महाविकास आघाडीच्या उमेदवार कोण असेल याची संकेत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यातील उमेदवारीकडे फक्त उमेदवारांचे च  नाही तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने