आघाव अध्यापक विद्यालयात शिक्षक दिन साजरा*



*आघाव अध्यापक विद्यालयात शिक्षक दिन साजरा*

धुळे. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या आघाव अध्यापक विद्यालयात आज दि.5 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब श्री पी एस सोनवणे होते. व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा श्री एम टी पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की डॉ. राधाकृष्णन हे एक राजकारणी. तत्त्वज्ञ व शिक्षण तज्ञ  होते त्यांनी सांगितलेल्या विचारांचे आदर्श आपण भावी शिक्षक म्हणून आचरणात आणले पाहिजे. असे सांगून त्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अनिता देवरे यांनी केले मनोगतात डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान विशद करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ.अरुणा कासारे यांनी मनोगतात शिक्षक फक्त ज्ञान न देता व्यक्तिमत्व विकास घडवतात व जीवन जगण्याची कला शिकवतात राष्ट्रहित जोपासवे व उत्कृष्ट नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतो. 
अध्यापक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण दिवसाचे कामकाज छात्र अध्यापकांनी पाहिले . विद्यालयाचे प्राचार्य म्हणून द्वितीय वर्षाची छात्र अध्यापिका विशाखा देशमुख व उपप्राचार्य म्हणून दुर्गेश शिंदे यांनी धुरा सांभाळली प्राध्यापक म्हणून छात्र अध्यापकांनीच कामकाज पाहिले. प्रथम वर्षाला अध्यापक म्हणून श्रावणी पाटील. भूमिका पवार. लक्ष्मी गायकवाड. अभिषेक उदे कर. मयुरी सूर्यवंशी व सचिन मघाडे तर द्वितीय वर्षाला अध्यापक म्हणून सिद्धेश चौधरी. शालिनी पाटील. सुरेखा चौधरी. निकिता मराठे. रुपेश पाटील व नलिनी पाटील यांनी कामकाज पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कुमार चौरसिया यांनी केले तर सूत्रसंचालन प्राजक्ता वाघ व नलिनी पाटील यांनी केले शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विशाखा देशमुख. दुर्गेश शिंदे. नलिनी पाटील यांनी मनोगतात आपले अनुभव कथन केले कार्यक्रमात शिपाई म्हणून कामकाज पाहणारे अश्विनी गायकवाड व विशाल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ प्रा श्री पी एम पाटील व प्रा श्री बीके मराठे. प्रा श्री व्ही आर पाटील. प्रा श्री एच आर बडगुजर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व छात्र अध्यापक उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद कुमार चौरसिया यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने